कम्युनिटी पोलीसिंग / दादालोरा एक खिडकी योजनेच्या अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया : –

  सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांचे वतीने कम्युनिटी पोलीसिंग / दादालोरा एक खिडकी योजनेच्या अंतर्गत मा.श्री . निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, मा.श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली जि.प. शाळा कडोली अंगणवाडी केंद्र जांभळी व डोंगरगांव येथील विद्यार्थ्याना स्कूल बॅग , वॉटर बॉटल व टिफीन बॉक्स वाटप तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना टि शर्ट वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. . 

  🔸सदर कार्यक्रमा करीता श्री . संकेत देवळेकर , उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हजर होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना श्री. संकेत देवळेकर , उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग देवरी यांनी सांगीतले की , स्पर्धा परिक्षा किंवा पोलीस भरती परिक्षेकरीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे . सदरवेळी प्रमुख पाहूणे म्हणून मा. श्री. राजीव वरभे, अध्यक्ष रोटरी क्लब नागपुर, साऊथ ईस्ट यांनी सांगीतले की , सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव यांचे वतीने घेण्यात येत असलेले उपक्रमांना रोटरी क्लब कडुन संपुर्ण सहकार्य मिळेल. सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव, यांनी अशा प्रकारचे उपक्रम नियमीत राबवावेत. सदरवेळी केशोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम,श्री जिवन जवंजाळ, अध्यक्ष जिवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर , श्री सुहास खरे अध्यक्ष माउली सेवा मित्र मंडळ , यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले .... 

  🔹सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून श्री अश्विन रडके अॅडमीनिस्ट्रेटीव्ह ऑफीसर , शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर , श्री विक्रांत काळे मॅनेजर एचडीएफसी बॅक नागपूर , बोंडगाव चे ग्रामपंचायत सदस्य श्री नरेश बोरकर , जि.प.शाळा कडोलीचे मुख्याध्यापक दहेकर सर , सहशिक्षक केराम सर , जांभळी अंगणवाडी शिक्षीका श्रीमती तुलावी मॅडम , डोंगरगाव अंगणवाडी शिक्षीका श्रीमती उईके मॅडम हजर होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे यांनी केले व सुत्रसंचालन केशोरी पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. प्रताप बाजड यांनी केले तर आभार पो.उप.नि. शुभम नवले यांनी मानले . 

   🔸 सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.फी. राजकुमार घोरमारे , पो.हवा . शामराव मडावी , सतिश भोवते , राजेश पुराम , देवेंद्र थेर , गणेश मिसार पोलीस नाईक कमलेश राऊत , किशोर नखाते , अरविंद वालदे पो . शि . प्रकाश गभने , नोहरलाल लिल्हारे , रत्नशिल मेश्राम , नागेश देवकर व आय.आर.बी. अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट