कम्युनिटी पोलीसींग / दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन ” सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे नवरात्रोत्सवानिमीत्त सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:- मा . श्री . निखील पिंगळे सा . पोलीस अधिक्षक गोंदिया , मा . श्री . अशोक बनकर सा . , अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कँप देवरी , मा . श्री . संकेत देवळेकर सा . उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे कम्युनिटी पोलीसींग / दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .
दि. २४/१०/२०२३ रोजी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गोठणगांव यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमीत्त विविध सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन मंडळाने यंदा ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे .

सदर सांस्कृतीक नृत्य कार्यक्रमामध्ये गोठणगांव व बोंडगांव येथील जि.प.प्राथमिक शाळा वर्ग १ ला ते ०७ वा या वर्गातील स्पर्धकांनी भाग घेतला . सदर स्पर्धेत गृप डान्स व सोलो डान्स आयोजित करुन विभागवार प्रत्येकी सहा बक्षिसे वितरीत करण्यात आली . गृप डान्समध्ये शिवानी शेन्डे गृप गोठणगांव व सोलो डान्समध्ये पायल सयाम बोंडगांव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी सपोनि श्री . सचिन घाटे व प्रमुख पाहुणे म्हणुन अर्जुनी / मोर पंचायत समिती सदस्य सौ . आम्रपाली डोंगरवार , गोठणगांव ग्रामपंचायत सरपंच श्री . संजय ईश्वार , उपसरपंच श्री . कांतीलाल डोंगरवार उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवचे पोउपनि.शुभम नवले, पोहवा. राजेश पुराम , गणेश मिसार , पोना . किशोर नखाते , कमलेश राऊत , अरविंद वालदे , पोशि . प्रकाश गभणे व नोहरलाल लिल्हारे , नागेश देवकर तसेच आयआरबी चे पोउपनि . युवराज अटकरे. व अंमलदार तसेच गोठणगाव वा परिसरातील २५० गावकरी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com