दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून (एक हात मदतीचा) अंतर्गत अतिदुर्गम नक्षल प्रभावित पीपरिया भागातील आदिवासी शेतकरी बांधवांकरीता कृषी विज्ञान केंद्र साकोली (जि-भंडारा) येथे कृषिविषयक मार्गदर्शनपर शिबिर कार्यक्रमाचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-

    सालेकसा तालुक्यातील पिपरीया हा भाग अतिदुर्गम नक्षल प्रभावित अतीसंवेदनशिल भाग आहे. स.दु. पिपरीया येथील आदिवासी शेतकरी बांधव यांने मनात शासनाप्रती व पोलीस दलाप्रती आपुलकी आणि चांगली प्रतिमा निर्माण व्हावी या दृष्टीने पोलीस अधिक्षक मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक मा. श्री.अशोक बनकर यांचे संकल्पनेतून या भागातील जनतेचे आणि पोलीस संबंध अधिक मजबूत व्हावे व गोदिया जिल्हयातील अतिदुर्गम क्षेत्रातील कृषी बांधव व आदिवासी बांधवामध्ये पोलीस दल प्रशासनाबाबत विश्वासाची व आपुलकीची भावना निमार्ण व्हावी या उदेश्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमाने  (एक हात मदतीचा) अंतर्गत या हद्दीतील कृषि , शेतकरी प्रामुख्याने भात (धान) या पिकाचे उत्पादन घेतात परंतु त्यांनी भात उत्पादन पद्धत ही पारंपारीक असून त्यामुळे त्याना मुबलक प्रमाणात (धान) उत्पादन होत नाही. म्हणून पोलीस दलामार्फत दादालोरा खिड़की योजने अंतर्गत पिपरीया हद्दीतील आदिवासी शेतक-यानां धान पिकाबाबत अदयावत मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती व्हावी याकरिता कृषी विज्ञान केंद्र साकोली (जि-भंडारा) येथे शेतक-यांचे आज दि 26 / 10 / 2023 रोजी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबीरामध्ये खालील नमुद प्रमाणे कृषी विज्ञान केंद्र साकोली (जि-भंडारा) येथील कृषी तज्ञ यांनी योग्यप्रकारे शेतक-यांना मार्गदर्शन केले...

१) डॉ प्रशांत उबरकर ( किटक शास्त्र धान तंज्ञ ) पिकावरील किट व्यवस्थापनक मध्ये कामगंध सापळयांचा वापर पिवळे चिकट सापळ, ट्रायकोकार्ड, प्रकाश, सापळयाचा वापर नैसर्गिक शेतीमध्ये बिजामृत, जिवामृत, घनजिवामृत, निबोळी अर्क, दापणी, अर्क, ई. चा वापर या विषयावर सविस्तर माहिती देवुन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले…

२) डॉ प्रवीण खिलारी (पशुसवर्धन व दुग्धशास्त्र तज्ञ ) शेळीपालन , कोंबळीपालन, चारापिक लागवड, अॅझोडा, उत्पादन गांडुळ खत तयार करण्याची पध्दत या विषयावर सविस्तर माहिती देवुन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले,

३) डॉ प्रमोद पर्वते ( विस्तार शिक्षण तृनधान्य तंज्ञ ) पिकाचे लागवड व आहारा मध्ये वापर या विषयावर सविस्तर माहिती देवुन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले..

४) डॉ योगेश महल्ले (कृषी अंभयांत्रीका तंज्ञ ) यांनी धान पिका मध्ये यांत्रिका करण्याचा वापर जलसंधारण दालमिल या विस्तार विषयावर सविस्तर माहिती देवून योग्य प्रकारे मार्गदर्शन केले…

५) डॉ कचंन तायडे (उदयामविदया तंज्ञ ) यांनी पोषन वाटीकेचे महत्व व भाजीपाला लागवड या विस्तार विषयावर सविस्तर माहिती देवून योग्य प्रकारे मार्गदर्शन केले..

६) डॉ लयत आनित्य (हवामान शास्त्र तज्ञ ) यांनी जिल्हा हवामान केंद्रा विषयीमाहिती देवुन धानाची विवीध लागवड पध्दती विषयी विस्तार पुर्वक माहिती देवुन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले..

७) डॉ मिलींद मेश्राम (वरिष्ठ भात पैदासकर तंज्ञ ) यांनी कृषी संशोधन केंद्राने विकसीत वाणा विषयी विस्तार पुर्वक माहिती देवून योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.

८) डॉ उषा डोंगरवार (वरिष्ठ कृषी तज्ञ व प्रमुख) यांनी कृषी मध्ये विवीध सशोधन बाबत विस्तार पुर्वक माहिती देवुन योग्य प्रकारे मार्गदर्शन केले..

       सदर सहली मध्ये जवळपास 55 ते 60 आदिवासी शेतकरी बांधवांचा सहभाग होता. वरीलप्रमाणे सर्वांना भात (धान)पिकाचे आधुनिक तंत्रज्ञान व कृषी शास्त्राबाबत विस्तारपुर्वक महिती देवुन योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान सर्व कृषीबांधव यांचेकरिता सकाळी आल्पोहार व चहापाणी नंतर दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

    सदर कार्यक्रम  मा. पोलीस अधिक्षक श्री निखील पिंगळे पा. गोंदिया, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक बनकर सा देवरी, मा. संकेत देवळेकर सा उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, पोनि श्री बाबासाहेब बोरसे सा पो.स्टे. सालेकसा यांचे मार्गदर्शना खाली, सशस्त्र दुरक्षेत्र पिपरीया मेथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक सा, पोलीस उपनिरीक्षक सतोष माळगे सोबत पोहवा- येसुर, खोब्रागडे, मच्छिरके, भोवते , नापोशि बरईकर, माने, पोशि मडावी, कोरे, कराड, चिकने, मौजे, उके, पटले याप्रकारे नमुद सर्व  अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सर्वानी योग्य प्रकारे सहकार्य करून सदर कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पार पाडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट