नांगलवाडी फाटा येथील प्रीती पॅलेस हॉटेल समोर दुचाकीची चोरी आरोपी पोलीसांच्या ताब्यात..

उपसंपादक-रणजित मस्के
महाड :- अवघ्या 24 तासात एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुस्क्या..
महाड एमआयडीसी हद्दीमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
बिरवाडी येथील रहिवाशी संदेश उर्फ बाबू सुनील गुरव यांच्या मालकीची एक्टिवा 5G दुचाकी क्रमांक MH- 06 -CB 8003 ही घेऊन ते नांगलवाडी फाटा येथील प्रीती पॅलेस हॉटेलमध्ये भोजन करण्याकरिता आपल्या मित्रासोबत गेले होते.
यावेळेस चुकीने चावी गडीलाच राहिली असता थोड्यावेळात अज्ञात दोन व्यक्ती एकाच दुचाकीवर हॉटेलमध्ये आले व त्यापैकी एकाने गाडीला चावी असल्याने त्याचा फायदा घेत गाडीची चोरी केली.
गाडी मालक संदेश गुरव यांनी आजूबाजूला गाडीचा तपास केला परंतु गाडी कुठेच आढळली नसल्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं.
पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडी चोराला 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या.


विठ्ठल मारुती सरगर वय 25 वर्षे राहणार फुलेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तसेच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धेश मोरे हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com