गोंदिया जिल्हात हद्दपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🔹 हद्दपारीच्या आदेशाचा भंग करुन पुन्हा गोंदिया जिल्ह्यात आलेल्या आरोपी विरोधात कारवाई करत केशोरी पोलिसांनी केला गुन्हा दाखल......
♻️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मौजा-गोठणगाव येथे राहणारे आरोपी नामे- जितेन्द्र तुळशिराम गजभिये वय 40, सौ. सिंधु जितेन्द्र गजभिये ऊर्फ सिंधु मनिराम कोचे वय 40 वर्ष यांना मा. उपविभागीय दंडाधिकारी सा. अर्जुनी/मोर यांचे आदेशान्वये कलम 56 (अ) मु.पो.का. अन्वये दि. 11/10/2023 रोजी एक महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते....
▪️सदर आरोपी हे हद्दपार आदेशाचा भंग करून पुन्हा गोठणगाव मध्ये येऊन राहत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने केशोरी पोलीसांनी शहानिशा केली असता सदर दोन्ही आरोपी यांनी हद्दपारीच्या आदेशा चा भंग करून गोठणगाव येथे परत आल्याची खात्री झाली....
▪️सदर आरोपी यांनी हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून कोणतीही परवानगी नसताना गोंदिया जिल्ह्यात परत येऊन गोठणगाव येथे राहू लागलेत म्हणून केशोरी ठाणेदार सोमनाथ कदम यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला व सखोल तपास करून आरोपीं विरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
🎯 जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश➖➖👇
⏩ कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याचा किंवा आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपींची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल. असा विश्वास मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे ठाणेदार किशोरी श्री. सोमनाथ कदम यांनी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जनतेला दिलेला आहे...
🔹सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर , यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हवालदार उदयभान इंदूरकर, प्रेमदास होळी, राहुल चिचमलकर, कैलाश राऊत, प्रसन्या सुखदेवे यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com