कम्युनिटी पोलीसींग/ दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न ..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोदिया कॅम्प देवरी,श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव तर्फे कम्युनिटी पोलीसींग / दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊन राबविले जातात .

याचाच एक भाग म्हणून दि. १४/१०/२०२३ रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव येथील जिल्हा पोलीस व आय.आर.बी.चे अंमलदारांच्या सहभागाने धम्मचक्र प्रवर्तन दिना- निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणुन नवेगावबांध येथील बन्सोड दाम्पत्य उपस्थित राहीले . सदर कार्यक्रम केशोरीचे ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम,यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला . श्रीमती सपना बन्सोड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना महान नेत्यांचे आचार विचार आजच्या पिढीने आचरणात आणणे गरजेचे आहे असे सांगितले. सपोनि कदम यांनी मार्गदर्शन करतांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .

सदरवेळी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सपोनि, सचिन घाटे सा, पोउपनि प्रताप बाजड पो. स्टे.केशोरी, सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे स.फौ. राजकुमार घोरमारे , पोहवा. राजेश पुराम , गणेश मिसार, देवेंद्र थेर , पोना. किशोर नखाते , कमलेश राऊत, अरविंद वालदे , पोशि . प्रकाश गभणे व नोहरलाल लिल्हारे तसेच गोठणगाव व परिसरातील १५० ग्रामस्थ उपस्थित होते .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com