पुण्यात आणखी एका कोयत्या भाईला वाकड पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

0
Spread the love

पुणे : पिंपरी वाकड येथे दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या ‘भाई’ला वाकड पोलीस ठाण्या तर्फे अटक करण्यात आली.

पुण्यात आणखी एका कोयत्या भाईला वाकड पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

डेअरी फार्म समोर भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे शुक्रवारी पावणेदहाच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

आरोपी कृष्णा तुळशीराम राऊत वय 22 वर्षे रा. काळाखडक, वाकड, मूळ रा. वाशी, ता. भूम, जि. उस्मानाबाद ,असे अटक केलेल्या ‘भाई’चे नाव आहे. पोलीस कर्मचारी अतिक शेख यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सविस्तर वृत असे की ,आरोपी राऊत हा लोखंडी कोयता घेऊन डेअरी फार्म समोर भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता शेअरचॅटवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ त्याने व्हाटसअप स्टेटसला ठेवला असल्याचे पोलिसांना दिसून आले. आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहा.पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दीपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट