आगामी नवरात्रोत्सव सणाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेत, आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे उपस्थितीत, जिल्हा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास सज्ज राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
🪷 पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री.निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे उपस्थीत आणि मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, सर्व ठाणेदार यांचे बैठकीचे आयोजन कॉन्फरन्स हॉल, पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे दिनांक 10-10-2023 रोज मंगळवारला संपन्न
🔸 सदर बैठक दरम्यान पोलीस अधिक्षक, श्री . निखिल पिंगळे, यांनी दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येणारा नवरात्रोत्सव च्या अनुषंगाने जिल्ह्यांतील परिस्थीचा आढावा घेऊन त्यादृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सूचना दिल्या आहेत.
🔸 गोंदिया जिल्हयात यावर्षी दिनांक- 15-10-2023 रोजी ते 24-10-2023 रोजी दरम्यान हिंदू धर्मीय समाज बांधवांकडून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी गोंदिया जिल्हयात संभाव्य एकुण 540 दुर्गा मातेच्या मूर्तीची तर व 533 शारदा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
🔸 सदर नवरात्रोत्सव हा शांततेत, निर्विघ्नपणे पार पडावा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीकोनातून आयोजित बैठकीत जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा, यांना खालीलप्रमाणे निर्देश सुचना देण्यात आलेल्या आहेत----

1) नवरात्र उत्वस शांततेत पार पाडण्यासाठी मागील 05 वर्षांत नवरात्र उत्सवा दरम्यान दाखल असलेले गुन्हे, चालूवर्षी दाखल झालेले जातीय स्वरुपाचे दखलपात्र व अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे, मागील 05 वर्षात दाखल असलेले महिला अत्याचाराचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, अवैध दारु / जुगार /सट्टा- मटका असे अवैध धंदे गुन्हेगार, जातीय तेढ निर्माण करणारे गुंड यांचेविरुदध तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
2) माता दुर्गा, शारदा देवी मंडपाचे साईज हे नियमा नुसार राहतील व शहरी आणि ग्रामीण भागातील नागरीकाना ये- जा करण्यास त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.
3) ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, त्याअनुषंगाने कायदेशिर कार्यवाही करण्याचे दृष्टीने सर्व पो. स्टे. ला ध्वनीमापक यंत्रे पुरविण्यात आलेली आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
4) माता दुर्गा देवी, शारदा देवी यांचे विसर्जन मिरवणुकी दरम्यान व इतर वेळी आक्षेपार्य गाणी वाजविणार नाही याबाबत संबंधित मंडळाना सुचना द्याव्यात.
5) माता दुर्गा देवी, शारदा देवी मूर्तीचे विसर्जन मार्गावर विशेष आवश्यक बंदोबस्त नेमावा.
6) माता दुर्गा देवी, शारदा देवी, उत्सव, मिरवणूक, दांडीया व इतर कार्यक्रम व विसर्जन मिरवणुकी दरम्यान महीला व मुलीचे छेडछाडीचे प्रकार घडू नयेत याकरीता प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर महिला छेडछाडविरोधी पथक तयार करुन त्यांना नवरात्र बंदोबस्त दरम्यान गस्त करण्यास नेमावे. व आवश्यक कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
7) माता दुर्गा देवी, शारदा देवी विसर्जनाचे ठिकाणी भावीकाच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेवुन आवश्यक बंदोबस्त नेमावा.
त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव सणाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनास जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्ताचे संपुर्ण तयारीसह सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मा. पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी जिल्ह्यातील जनतेस नवरात्रोत्सव शांततामय वातावरणात आपसी सौहार्द , सामंजस्य , कायदा आणि सुव्यवस्था राखून उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.👏👏
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com