सातारा जिल्हयामध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- सातारा जिल्हयामध्ये सातारा कराड तालुक्यातील सातारा, बोरगांय, उन्नज पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) अमित ऊर्फ कन्हैय्या सुनिल साळुंखे, वय ३२ वर्ष रा. नागठाणे ता. जि. सातारा (टोळी प्रमुख) २) साहील रुस्तुम शिकलगार, वय २४ वर्षे, रा. नागठाणे ता. जि. सातारा (टोळी सदस्य) ३) अमर ऊर्फ भरत संजय मोहीते वय २६ वर्षे, रा. नागठाणे ता.जि.सातारा (टोळी सदस्य) ४) अशिष बन्सीराम साळुंखे व २७ वर्ष, नागठाणे ता.जि.सातारा (टोळी सदस्य) यांचेवर सातारा जिल्हयामध्ये न करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करणे, खंडणी करीता अपहरण करून खुन करणे, बेकायदेशीर शख बालगणे, कायदेशीर रखवालीमधून पळून जाणे वगैरेबाबत गुन्हे दाखल असल्याने बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक आर.जी यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती.




यातील टोळी ही सातारा जिल्हयातील सर्वसामान्य लोकांचे शरिराचे तसेच मालमत्तेचे नुकसान करून गुन्हे करीत होती. त्यांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यामध्ये सुधारणा झाली नाही. तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच पाक न राहील्याने अशा
गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती. परील टोळीला मा.समीर शेख, हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा चे समोर सुनावणी होन
त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला
आहे. नोव्हेंबर २०२२ पासून १२ उपद्रवी टोळयामधील ३५ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी उदार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा, बापू यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरप, पोना प्रमोद सावंत, पो. कॉ. वेतन लिये, म.पो. कॉ. अनुराधा सण यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com