गोंदिया जिल्हयात वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी-अंमलदार यांचे निरोप सत्कार कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🪷 आज दिनांक 03- 10-2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे- सप्टेंबर / 2023 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार --
1) सहाय्यक पोलीस उप- निरीक्षक श्री. राजकुमार लक्ष्मण खरोले,
2) श्री. कुवरलाल सितरुजी भगत,
3) श्री. सोपराम तानबाजी ढेंगे, तसेच
4) पोलीस हवालदार श्री. एकनाथ रामभाऊ सोनेवाने,




यांचे निरोप सत्कार सभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, यावेळी पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, यांचे शुभ हस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छा पत्र, देवुन सत्कार करण्यात आला.
सदरचे सेवानिवृत्ती निरोप सत्कार कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, प्रभारी पोलीस उप अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, तथा अति. कार्य. पोलीस उपअधिक्षक (गृह), श्रीमती चानपुरकर, यांनी केले. तर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता पोहवा राजु डोंगरे, राजु वैद्य यांनी कार्यवाही केली .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com