तरुणीवर बलात्कार करुन बोगस डॉक्टर फरार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

0
Spread the love

नांदेड – इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील कीनवट तालुक्यातील शिवणी येथे एका बोगस डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आदीवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील ही घटना घडली आहे. छत्तीसगड जिल्ह्यातील नेवाकुमार नारायण मंडल असं बलात्कार करणाऱ्या डॉक्टरचं नावं आहे. हा बोगस डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून शिवणी येथे दवाखाना थाटून बसला होता.

दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या 21 वर्षीय पिडीत तरुणीला बोगस डॉक्टरने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकीही या बोगस डॉक्टर ने दिली. तसेच तीचे अश्लील फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत बोगस डॉक्टरने पिडीत तरुणीवर वारंवार बलात्कार केला.

या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट