मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, चोरीच्या 5 मोटार सायकली जप्त, पोलीस स्टेशन गोरेगाव ची उल्लेखनीय कामगिरी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

               मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. अशोक बनकर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किशोर पर्वते, यांनी गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून गुन्हे उघडकिस आणण्या बाबत आदेशित करून निर्देश सूचना दिल्या आहेत.

       या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेश, निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली गोंदिया गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा पोलीस ठाणे स्तरावर शोध मोहीम हाती घेवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. 

         या अनुषंगाने पोलीस पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी,  यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोरेगाव येथील पोलीस पथक हे पो.स्टे. गोरेगाव अपराध क्रमांक 517/23 भादवी कलम 379 मधील गुन्ह्याचे तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार *आरोपी नामे -- 

(1) प्रशांत राजकुमार सयाम वय 19 वर्षे राहणार बिरडीटोला तालुका सडक अर्जुनी जि. गोंदिया हा चोरीच्या गुन्ह्यातील हिरो एचएफ डीलक्स मोटर सायकल मौजे चूलोद येथे विकणार असल्याची गुप्त बातमीदार बाबत माहिती मिळाली. तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीस गेलेली एचएफ डीलक्स 1) मोटरसायकल एम एच 35 एक्स 5240 ही मिळून आली. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता 2) दुसरी मोटर सायकल यामाहा कंपनीची एफ झेड फाईव मोटर सायकल नंबर नसलेली व 3) हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल नंबर नसलेली मिळून आली. आरोपीने गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले इतर साथीदार आरोपी नामे–
(2) साहिल उमेंन्द्र बिसेन वय 19 वर्षे राहणार बाम्हणी ता. गोरेगाव जि. गोंदिया याचे नाव सांगितले. त्यावरून आरोपी नंबर दोन याचे राहते गावी जाऊन शोध घेतला असता त्याचे ताब्यातून 4) हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 35 यु 2174 हे वाहन मिळून आले. तसेच अधिक तपास केले असता मौजा सटवा डव्वा येथुन 5) नंबर नसलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल मिळून आली. अश्या एकूण पाच मोटर सायकल ताब्यात घेण्यात आल्या असून नंबर नसलेल्या मोटर सायकलचे इंजिन व चेसीस नंबर वरून पुढील माहिती घेऊन तपास करीत आहे.

        मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पो. नि. अजय भुसारी, यांचे मार्गदर्शनात स. पो. नी गोसावी स. फौ. राजकुमार पवार, पो. हवा. रमेश पटले, पो. हवा. सुनिल वानखेडे, पो.शि. सुरेश राहांगडाले पो.शि.  कमलेश गराट, शैलेंद्र बोंदरे, तीरंजीव कुमडे, चाचेरे, निकेश राठोड यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट