रायगड येथील साई आशा सोसायटीत “स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा अंतर्गत स्वच्छ्ता अभियानसंपन्न…

उपसंपादक :राकेश देशमुख
महाड:
महाड:,” स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे”. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखली जावी, नवीन पिढीने स्वच्छता ही सवय बनवावी, असे ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सदर अभियान अंतर्गत रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी रायगड रोड लगत साई आशा सोसायटी मध्ये सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान साजरा करण्यात आला.

या मोहिमेमध्ये सोसायटीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार व सर्व रूम धारक, महिला मंडळ आदी उपस्थित होते.
सदर स्वच्छ्ता अभियाना दरम्यान श्रमदान करून सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात आला व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com