पाली पोलीस स्टेशनच्या गणपतीला निरोप देताना पाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी भावूक….

0
Spread the love

उपसंपादक.राकेश देशमख

सुधागड :

  सालाबाद प्रमाणे याही वर्षी पाली पोलीस स्टेशनच्या वतीने दहा दिवसाचा गणपती बसविण्यात आला होता. गणपती बाप्पाला सर्व जाती धर्माचे लोक मानतात, त्याची अधिपती म्हणून ही गणपती बाप्पाची ओळख आहे. पाली पोलीस स्टेशनने गणपतीची बसविण्याची सुरुवात 2007 पासून केली होती. आज ह्या गणपती बसविण्याच्या प्रथेला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. 

या गणपतीसाठी येथील पोलीस कर्मचारी दहा दिवस नीती नियमाप्रमाणे गणपतीची सेवा, पुज्या,आरती करीत असतात. यामुळे पोलीस स्टेशनचे वातावरण आनंदमय होते.

रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. रोज गणपतीला नवीन हार अर्पण केला जातो. पूजा पाठ केली जाते. नवव्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. सत्यनारायणाच्या पूजेला व गणेश दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविक नेहमीच येथे गर्दी करतात.

या दहा दिवसात पोलीस कर्मचारी मनापासून गणपतीची सेवा मनोभावे करीत असतात. पण दहा दिवसानंतर जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अंतकरण भरून आलेले दिसून येते. गणपतीला निरोप देताना पाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, ए. एस. आय. निलेश महाडिक, पोलीस निरीक्षक वसंत जीवडे, पोलीस हवालदार एस. एस. गायकवाड, पोलीस नाईक धर्मेंद्र म्हात्रे, पो. कारकून संतोष पवार, चालक पी.एस.आय. घाडगे, पोलीस नाईक सावंत, व इतर कर्मचारी बाप्पाला विसर्जनाला घेऊन जाताना भावूक झालेले दिसत होते.

पाली पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीनंतर पालीतील अंबानदी येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या वेळी गणपतीला हात जोडून पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रार्थना केली हे देवा सर्वांना सुखी, समाधानी, आनंदी तंदुरुस्त ठेव.
आमचे काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर कारण तू आमचा अधिपती आहेस.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट