सातारा विहीरीमधील इलेक्ट्रीक मोटर चोरणाऱ्या ५ जणांच्या सराईत टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा जिल्हयामध्ये सातारा व कराड तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत विहीरीमधील सातत्याने इलेक्ट्रक मोटर चोरीचे गुन्हे कारणारे टोळी प्रमुख १) गणेश बाळासाहेब कांबळे, व २९ वर्ष रा पेरले ता कराड जि.सातारा (टोळी प्रमुख) २) गणेश महेंद्र चव्हाण, वय २० वर्ष रा पेरले ता कराड जि सातारा (टोळी सदस्य) ३) अभय जनार्दन चव्हाण वय २१ वर्ष पेरले ता रा जि सातारा (टोळी सदस्य) ४) आप्पा रघुनाथ सातपुते, वय २० वर्ष रा पेरले ता कराड जि सातारा (टोळी सदस्य) ५) सद्दाम शब्बीर अहमद व २९ वर्ष काशीळ तानि सातारा मुळगांव निवा मोहबाजार ता बदलापुर जि जीनपुर राज्य उत्तरप्रदेश (टोळी सदस्य) यांचेवर सातारा जिल्हयामध्ये विहीरीमधील तसेच नदीवरील इलेक्ट्रीक मोटर चोरी करणेबाबत गुन्हे दाखल असल्याने उब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.

पातील टोली ही सातारा जिल्हयातील शेतकरी लोकांच्या विहीरीमधील तसेच नदीवरील इलेक्ट्रीक मोटरची चोरी करीत होती त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत होते, त्यांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करूनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच पाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीला मा.समीर शेख, हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्यये सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हदपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून ११ उपद्रवी टोळयांमधील ३१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्री बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो. का. केतन शिंदे, स.पो.कॉ. अनुराधा सणस यानी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

सुरक्षा पोलीस टाइम्स पत्रकार ,ता. रोहा , जि. रायगड विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट