सालेकसा पोलीसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 7 गोवंशीय जनावरांची सुटका.. एकुण 5 लाख 70 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

➡️ पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदार यांना जिल्ह्यांतील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणा-याच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाई करून अंकुश व आळा घालण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या.

             या अनुषंगाने  पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे, आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे सालेकसा पोलीसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.

   या अनुषंगाने दिनांक 22-09-2022 रोजी सालेकसा पोलीसांनी  मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मौजा- निंबा ते जांभळी जाणाऱ्या रोडावर अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली असता एक अशोक लेलँड कंपनीचा मालवाहक ट्रक क्र. एम. एच-40 सी. डी. 3407 मिळुन आले. त्यात दोन ईसंम नामे - 1)अरजाफ असफाख शेख कुरैशी वय 30 वर्षे राहणार-रामनगर गोंदिया, 2) वसीम सलीम खान वय 35 वर्षे राहणार चंगेरा, गोंदिया हे मिळून आलेत. त्यांना चौकशी करून मालवाहक ट्रकचे डाल्याची पाहणी केली असता डाल्यात लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 7 जनावरे दोरीने दाटी वाटीने डांबून जनावरांना कोणत्याच प्रकारचे चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधलेल्या स्थितीत मिळुन आले. गोवंश जातीचे लहान मोठी जनावरे कि.अं.70 हजार.  व मालवाहक ट्रक कि. अं. 5 लाख /-रु असा एकुण 5 लाख 70 हजार /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पो.ठाणे सालेकसा येथे आरोपी नामे- 

1) अरजाफ असफाख शेख कुरैशी वय 30 वर्षे राहणार-रामनगर गोंदिया ,

2) वसीम सलीम खान वय 35 वर्षे राहणार चंगेरा, गोंदिया

    यांचेविरूद्ध पो.ठाणे सालेकसा येथे अप क्र. 338/2023 कलम  5 (अ) (1), 5 (अ) (2),5 (ब) (6), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 11 (घ) (च) (ज), (झ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने गौशालेत दाखल करण्यात आले आहे.

        सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, उप-विभागिय पोलीस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सालेकसा पो.नि.बाबासाहेब बोरसे, पो.उप.नि.अजय पाटील, पोशि.अजय इंगळे,विकास वेदक, म.पो.शि. तुरकर पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट