मुंबईत रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्याला आरे पोलीसांनी ठोकल्या बेड्या. …

0
Spread the love

मुंबई – गोरेगांव येथे दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी रात्री आरे पोलीस ठाणे हद्दीत दुकानातील गरिबांसाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती ज्योती देसाई यांनी आपल्या टीमच्या मदतीने 20 हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी २४ लाख रुपयांच्या गहू आणि तांदळाच्या गोण्या जप्त केल्या आहेत.

आरे पोलीस ठाणे मुंबई

गोरेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे मुंबईच्या विविध भागांमध्ये अधिक दराने विकले जात होते.

गोरेगांव येथील रेशनिंग गोडाऊन

याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा आरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने छापा टाकला.

या छाप्याममध्ये पाच ट्रकसह तब्बल २५ लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हा सर्व साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होता अशी माहिती मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली असुन संबंधितांवर अत्यावश्यक वस्तु अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट