शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक

दिनांक २१/०९/२०२३ रोजी पहाटे ०३ / ०० वा. सुमारास सपोनि / गणेश शेळके नेम, नाशिक रोड पोलीस स्टेशन यांना पोउपनिरी/ तुषार धाकराव, स्था. गु. शा. अहमदनगर यांनी कळविले की, शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सावळीविहीर याठिकाणी जुन्या कौटूबिक वादाच्या कारणातून दि. २०/०९/२०२३ रोजी रात्री ११ / ०० वा. सुमारास जावयाने चुलतभावासह सासुरवाडीला जावून सासुरवाडीमध्ये असलेल्या पत्नी, मेव्हणा आजेसासू, सासू, सासरे, मेव्हणी यांच्यावर धारदार चाकूने वार करून हल्ला केला असून त्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर इतर ०३ गंभीर जखमी आहेत. हे हत्याकांड करणारे आरोपी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकम हे दोघे नाशिकच्या दिशेने पळून जात आहेत. तरी सदर आरोपींचा शोध घ्यावा बाबत कळविले. सपोनि / शेळके यांनी सदरची बातमी वपोनि / देविदास वांजळे यांना कळविली व त्यांनी सपोनि शेळके, रात्रस्त अधिकारी पोउपनिरी रामदास विंचू व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले.

त्यानुसार दि. २१/०९/२०२३ रोजी पहाटे ०३ / १० वा. सपोनि गणेश शेळके, पोउपनिरी रामदास विंचू व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी तात्काळ नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव टोलनाका याठिकाणी जावून सापळा रचला. यादरम्यान नाशिक बाजूकडे येणा-या वाहनांची तपासणी करत असताना एक काळया रंगाची विनाक्रमांकाची पल्सर मोटारसायकल येताना दिसली त्यांना थांबण्याचा इशारा केला असता न थांबता वेगात जावू लागल्याने तेच आरोपी असल्याचा संशय बळावल्याने पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना पहाटे ०३ / ३२ वाजताच्या सुमारास पल्सर मोटारसायकलसह जागीच ताब्यात घेतले. त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी १) सुरेश ऊर्फ बाळू विलास निकन वय ३२ वर्षे, २) रोशन कैलास निकन वय २६ वर्षे दोघे रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर जि. अहमदनगर असे सांगितले. त्यांचेकडे घटनेबाबत चौकशी केली असता मिळालेली माहिती अशी की, आरोपी सुरेश निकम याचा ०९ वर्षापूर्वी सावळीविहीर येथील वर्षा सुरेश निकम हिच्याशी झालेला असून मागील काही दिवसांपासून दोन्ही कुटूंबामध्ये त्यावरून वारंवार वाद व कौटूबिक कलह चालू आहेत. याच जुन्या कौटूंबिक वादामुळे आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी सावळीविहीर येथे जावून सासुरवाडीच्या लोकांवर चाकूसारख्या धारदार व तिक्ष्ण हत्याराने वार केले त्यात सुरेश निकम याचा १) मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड वय २६ वर्षे २) पत्नी वर्षा सुरेश निकम वय २४ वर्षे ३) अनेसासु हिराबाई धुपद गायकवाड वव ७० वर्षे यांचा मृत्यू झाला असून सायू संगिता चांगदेव गायकवाड वय ४५ वर्षे, सासरे चांगदेव ग्रुपद गायकवाड वय ५५ वर्षे व मेव्हणी योगिता नहेंद्र जाधव वय ३० वर्षे सर्व रा. सावळीविहीर ता. राहता हे गंभीररित्या लखमी झाले असून त्यांचेवर श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार चालू आहेत. आरोपी गुन्हा घडल्यानंतर

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमार्ग परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं ८६४ / २०२३ भादंवि कलम ३०२, ३०७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी १) सुरेश विलास निकम वय ३२ वर्षे, २) रोशन कैलास निकम वय २६ वर्षे दोघे रा.

संगमनेर खुर्द ता. संगमनेर जि. अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ना. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, ना. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती मोनिका राळत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, श्री. आनंद वाघ, नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. देविदास वांगळे यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश शेळके, पोउपनिरी रामदास विंचू, पोना/ ७६० सुभाष घेगडमल, पोना / १८५१ संदीप पवार, पोशि/ २३८१ गोकुळ कासार, पोशि/ २२५५ कल्पेश नायव, पोशि/ ३१८ भाउसाहेब चत्र, पोशि/ १९१ ताजकुमार लोणारे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट