अल्पवयीन मोलकरीणवर जंगलात बलात्कार आरोपीस गणेशपुरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या- श्रमजीवी संघटनेचा पुढाकार.

0
गणेशपुरी पोलीस ठाणे
Spread the love

ठाणे – भिवंडीत दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी एका १४ वर्षीय अल्पवयीन मोलकरीणवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आरोपी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे. लडकू मुकणे असे अटक आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीच्या वडिलांचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले, तर तिची आईही एकटीला सोडून निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या पीडिताला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आरोपीने नातवंड आणि घराच्या बकऱ्या चरण्यासाठी तीला कामाला ठेवले होते. त्यातच मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी मालकाने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. मात्र, जिवाच्या भीतीने पीडिता घाबरल्याचे पाहून आरोपी मालकाची हिंमत वाढली आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.

पीडित मालकाचा अत्याचार मुकाट्याने जिवाच्या भीतीने सहन करीत होती. त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पाहिले असता तिला धक्काच बसला होता. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्याची हकीकत सांगितली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचुन तातडीने आरोपी लडकू यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .पोलीसानी अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपी मालकावर गुन्हा दाखल करतेवेळी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार, जया पारधी, नारायण जोशी, आशा भोईर, दुष्यंत घायवट ,जयेश पाटील, रुपेश जाधव, योगेश लोखंडे, वैशाली पाटील, संगीता भोईर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट