गुन्हेगारी टोळीतील तिघे जणांना नंदुरबार पोलीसांनी जिल्ह्यातुन केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार :- सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी टोळीच्या ३ इसमांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांना दोन वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिले असून त्यानुसार दोघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारी टोळीतील ३ इसमांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यानुसार सारंगखेडा पोलिस ठाण्याकडे एका टोळीवर प्रतिबंधक कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक कार्यालयात प्राप्त झाला. त्यानुसार प्रस्तावाचा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी आढावा घेवून छाननी करीत योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. गुन्हेगारी टोळीतील ३ इसमांना दोन वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले. त्यानुसार टोळीतील आनंदा धोंडू कोळी (वय ५७, रा. शेल्टी, ता. शहादा), रजत आनंदा सावळे (वय २६, रा. शेल्टी, ता. शहादा), राहूल आनंदा सावळे (वय ३०, रा. शेल्टी, ता. शहादा) या तिघांना हद्दपार करण्यात आले आहे. या इसमांना ४८ तासाच्या आत जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट