मारहाण करुन हप्ता मागणा-या सराईत गुंडांना कराड शहर पोलीसानी शिताफीने जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा- कराड

हत्यार व रोकड असा मुददेमाल हस्तगत कराड शहर पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे टिमची अति प्रशंसनीय कामगिरी..!

कराड शहर पोलीस ठाणे हरीत मलकापुर नगरपालीका हददीमध्ये फाळकूट दादांचे गल्ली दादांचे वर्चस्व वाढल्याचे कुणकुण चालू होती. कराड शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी कराड शहर पोलीसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे व गुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्याचे कार्य कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदिप सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांचे नवीन पोलीस टीमने स्विकारले असुन त्यादृष्टीने वाटचाल सुरु केलेली आहे.

श्री. राहुल राजेंद्र मासाळ यांनी कापड दुकानाकरीता मलकापूर ता. कराड शहरातील मलकापूर फाटा येथे नव्याने दुकानगाळा विकत घेतला असून त्या दुकानगाळयामध्ये ते आर. एम. मेन्सवेअर नांवचे कापड दुकान चालवितात. दिनांक 14.09.2023 रोजी सायंकाळी 7 वा. चे सुमारास फल उर्फ पप्पू लियाकत पठाण, शंतनू, रोहीत व मारुती पूर्ण नावे माहीती नाही यांनी सदर कापड दुकानासमोर मोटार सायकलवरुन येवुन राहुल्या, बाहेर ये, तुला मस्ती आलीया, तुला आज घोडाच लावतो, माझ्या गँगला व मला तुझ्याकडून ५०००/- हाता पाहीजे, चलं काढ हप्ता असे म्हणून मोठमोठयाने आरडोओरडा, शिवीगाळ दमदाटी करीत दहशत माजवून दुकानात घुसून हप्ता देत नसल्याचे पाहून स्वतःच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीस गंभीर दुखापत करण्याचे इरादयाने अंगावर यार करुन दुखापत करण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचे खिशातील रु. 1800/- रु. जबरीने काढून पुन्हा आलो की राहीलेला हप्ता दयावा लागेल असे सांगुन निघुन गेले. याची माहीती प्राप्त होताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक व डी. भी. टीमला आदेश दिला त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाने मलकापुर परीसरात पेट्रोलींग करुन माहीतीच्या आधारे चारही फाळकूट दादांना शिताफीने ताब्यात घेतले. फिर्यादी श्री. राहुल राजेंद्र मासाळ यांनी दिले फिर्यादीवरून कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा क्र. 1071/2023 चा दाखल करण्यात आला असून आरोपी फल उर्फ पप्पू लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे यांना अटक करणेत आली आहे. आरोपीकडून गुन्हयात वापरलेले शख, मोटार सायकल व जबरीने चोरुन नेहलेली रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे.

कराड शहर पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करणेत येते की, कोणी असे फाळकुट दादा कोणाकडे हप्ता मागत असतील तर त्याबाबत कराड शहर पोलीसांना माहीती दयावी. अशा फळकूट दादांचा कायमचा बंदोवस्त करणार असून अशा लोकांची माहीती अभिलेख पडताळणेचे कामचालु असून भविष्यात त्यांना हददपारी सारख्या कडक कारवाया करणेत येणार असलेचे वपोनि श्री. सुर्यवंशी यांनी आवाहन केले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बागर सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभुते, पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे, सफौ रघुबीर देसाई, संजय देवकुळे, पो. हवा, शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट