महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटने तर्फे पालघर जिल्ह्यात एका सुसज्ज कारागृहाची व मराठा आरक्षण मोर्चात निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना परत सेवेत रुजू करण्याची मागणी…

0
WhatsApp Image 2023-09-15 at 9.04.03 PM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राहुल अर्जुनराव दुबाले साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री. योगेश जी कदम साहेब, तसेच मुंबई/ पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज शुक्रवार १५/०९/२०२३ रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई मा. श्री. प्रवीण जी साळुंखे साहेब व पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन पालघर जिल्ह्यामध्ये सुसज्य असे कारागृहाचा प्रस्ताव व जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण मोर्चात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात जे पोलीस कर्मचारी व अधिकारी बेकायदेशीपणे निलंबित व सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडण्यात आले त्यांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घ्यावे हे दुबाळे साहेबांचे विनंती पत्र त्यांना सदिच्छा भेटून देण्यात आले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाची स्तुती करत नवीन पिढीला शिक्षणाची माहिती व महत्त्व पटवून दिले.
उपस्थित . पोलीस अधिकारी व कर्मचारी . पालघर जिल्हा सल्लागार संजय राऊत साहेब पालघर तालुका अध्यक्ष संदेश मोरे साहेब पालघर तालुका सचिव किरण पाटील साहेब पालघर तालुका संघटक अमोल गायकवाड साहेब पालघर सदस्य दीपक मोरी साहेब . पालघर जिल्हा उपाध्यक्ष . सौ. शितल ताई उईके अशी माहिती श्री मंगेश उईके महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट