कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, विभागीय शाखा विरार व वसई विरार कुणबी अस्मिता संस्था. व तालुक्यातील ओबीसी समविचारी संघटना यांच्या वतीने वसई तहसीलदार यांना मराठा समाजाला कुणबी समाजाच्या कॅटेगरीमधुन आरक्षण न देण्याचे निवेदन सादर…

0
Spread the love

वसई:

प्रतिनिधी- भास्कर पवार

वसई- मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसुत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये व त्यांना कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेऊ नये, यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई , विभागीय शाखा विरार व वसई विरार कुणबी अस्मिता संस्था तसेच ओबीसी समविचारी संघटना यांच्या वतीने आज शुक्रवार दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता वसई तहसिलदार डॉ. अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले कि, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे. त्याठिकाणी उपस्थित जमावावर २ सप्टेंबरला पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल. राज्यसरकार मराठा समाजाला ओबीसी कँटेगरीमधून आरक्षण न देता ईडब्ल्यूएस सारखे आरक्षण देणार असेल तर त्याला ओबीसींचा विरोध असण्याचे कारण नाही, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी विभागीय शाखा विरार चे अध्यक्ष श्री किशोर भेरे, सचिव श्री विलास सुवरे, युवाध्यक्ष श्री अविनाश पाचकले, युवा सचिव श्री एकनाथ डिंगणकर,सह सचिव दिलीप रहाटवळ, वसई शाखा संघटक श्री अनंत फिलसे, प्रचार प्रमुख शैलेश दळवी, पत्रकार श्री मंगेश घडवले , ओबीसी संघर्ष समिती उपाध्यक्ष श्री तुकाराम पष्टे, वसई विरार कुणबी अस्मिता संस्थे चे राजेंद्र पाटील, जयंत देसले, अशोक जाधव , संदीप खैर , विजय पाटील, योगेश जाधव , मोहन पाटील, नरेंद्र पाटील , रवींद्र पाटील आदिंसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट