रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून मुंबई,नवी मुंबई,ठाणे,मीरा-भाईंदर व पालघर येथे FZ बाईक वरून येऊन कारटेप, लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्या 40 ते 50 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपीस एम.एच.बी काॅलनी पोलीसानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :

➡️ सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की…

दिनांक 12/02/2023 रोजी फिर्यादी श्री आकाश श्रवण सोमानी वय वर्षे यांनी त्यांची हुंडाई कंपनीची मोटार कार MH 47 AY 9319 ही दुर्गा गार्डन न्यू लिंक रोड , बोरवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी व्यवस्थित रित्या पार्क करून गाडीमध्ये डेल कंपनीचा लॅपटॉप किंमत अंदाजे रुपये 50000 / ठेवून त्यांच्या कामासाठी निघून गेले. त्यानंतर थोड्यावेळाने फिर्यादी यांनी येऊन पाहिले असता त्यांना त्यांचे गाडीची काच फुटलेली दिसली तसेच त्यातील लॅपटॉप मिळून आला नाही.त्यावरून फिर्यादी यांनी पोलीस ठाणेस येऊन तक्रार दिल्यावरून त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा नोंद क्रमांक 76/ 2023 कलम 379,427 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

➡️ तपास …
वर नमूद गुन्ह्याची कार्यपद्धती तसेच प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीत इसम हे काळ्या रंगाची FZ बाईक वापरत असल्याचे दिसून आले नमूद रंगाची बाईक द्वारे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर तसेच पालघर येथे देखील अशाच प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे दिसून आले.त्याअनुषंगाने सपोनि सुर्यकांत पवार व पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांनी परिमंडळ 11 अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याचे ठिकाणाचे सेल आयडी प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता सदरचे गुन्हे हे पारधी समाजातील सराईत आरोपीत इसमाने केले असल्याचे समोर आले.
नमूद आरोपीत इसमाने गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हे बंद असल्याने पोलीस पथकाने कुलाबा ते दहिसर येथील फुटपाथ तसेच वाघरी समाजाचे वस्तीमध्ये आरोपीत इसमा बाबत शोध घेतला असता माहिती मिळून आली की, बहुतांश पारधी समाजातील लोकांचे पाल्य हे सप्तश्री हॉस्टेल, कसारा घाट, जिल्हा नाशिक येथे शिक्षण घेत असून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या रविवारी प्रत्येक पालक हे त्यांना भेटावयास येत असत.

त्या अनुषंगाने पाहिजे आरोपीत इसमाबाबत देखील माहिती घेतली असता आरोपीत इसमाची मुलगी ही नमुद ठिकाणी शिक्षण घेत असून आरोपीत इसम तिला भेटावयास जात असतो.

दिनांक 03/09/2023 रोजी सपोनि सुर्यकांत पवार व पथक हे रात्रपाळी कर्तव्य करून घरी जात असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीत इसम हा त्याचे मुलीला भेटावयास कसारा घाट जिल्हा नाशिक येथे जाणार आहे.
त्यावरुन मा. वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन पोलीस पथकाने नमूद सप्तश्री हॉस्टेल, कसारा, जिल्हा नाशिक येथे सापळा रचून सदर गुन्ह्यातील आरोपीत इसमास अटक केलेले आहे.

अटक आरोपी नाव व पत्ता
शेरा सवरु चौहान वय 39 वर्ष, व्यवसाय- रिक्षा चालक, रा.ठि:- दामोदर वाडी, शंकर मंदिराजवळ, नायगाव,जि- पालघर

गुन्हे अभिलेख:-

आंबोली पोलीस ठाणे –
गुरक्र.263/16 कलम-379,427 भादवी
बोरिवली पोलीस ठाणे
गुरक्र.556/15
कलम-379,427 भादवी
अंधेरी पोलीस ठाणे
1)गुरक्र.688/15
कलम-454,457,380 भादवी
2)गुरक्र.348/16
कलम-457,380 भादवी
खेरवाडी पोलीस ठाणे
गुरक्र.159/16
कलम-379,427 भादवी
मलबार हिल पोलीस ठाणे
1)गुरक्र.95/19
कलम-420,419 34 भादवी
2)गुरक्र.95/18
कलम-379,427 भादवी
विलेपार्ले पोलीस ठाणे
गुरक्र.174/16
कलम-379,427 भादवी
दहिसर पोलीस ठाणे
1)गुरक्र.315/16
कलम-379,427 भादवी
2)गुरक्र.235/15
कलम-379,427 भादवी
वाकोला पोलीस ठाणे
1)गुरक्र.259/16
कलम-379,427 भादवी
2)गुरक्र.260/15
कलम-379,427 भादवी
एन आर आय पोलीस ठाणे
गुरक्र.218/20
कलम-379,427 भादवी
चारकोप पोलीस ठाणे
गुरक्र.347/06
कलम-457,380,34 भादवी
नालासोपारा पोलीस ठाणे
गुरक्र.357/16
कलम-379,427 भादवी

यातील अटक आरोपीत इसम हा मशीन असून गाडीची काच फोडुन तसेच कार टेप उचकटून काढणे ही कामे तो करत असून त्याचा साथीदार मोटरसायकल रायडर विनोद पवार याचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक MH 01 S 2766 ही हस्तगत करण्यात आलेली असून यातील आरोपीत इसमाने सदर गुन्ह्यतील चोरी केलेली मालमत्ता लॅमिंटन रोड तसेच अहमदाबाद येथे विक्री केले असून सदर ठिकाणी जाऊन मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.

➡️ उघडकीस आलेले गुन्हे
एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे
1)गु.र.क्र.33/23 कलम- 379,427 भादवी.
2)गु.र.क.76/23 कलम- 379,427 भादवी
3)गु.र.क्र.112/23 कलम- 379,427 भादवी
4)गु.र.क्र.138/23 कलम- 379,427 भादवी
5)गु.र.क्र.286/23 कलम- 379,427 भादवी
6)गु.र.क्र. 308/23 कलम- 379,427 भादवी

तसेच अटक आरोपीत इसमांकडून परिमंडळ 11 व इतर ठिकाणाचे एकूण 20 ते 30 गुन्हे तसेच ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदर,पालघर येथील एकूण 40 हून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत

तपास मार्गदर्शन:-
1) मा.श्री राजीव जैन, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई
2) मा.श्री अजय कुमार बंसल, पोलीस उपायुक्त,परिमंडळ 11,मुंबई

तपास देखरेख:-
मा.श्री.धरणेंद्र कांबळे, सपोआ बोरवली विभाग, मुंबई

तपास सहभाग:-
1) सुधीर कुडाळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम .एच. बी कॉलनी पोलीस ठाणे,मुंबई
2) पोलीस निरीक्षक सचिन शिंदे (गुन्हे )

तपास पथक
सपोनि सूर्यकांत पवार
पो.उप.नि अखिलेश बोंबे
पो.ह 961391/अनिल शिंदे
पो.ह 990320/ जोपळे
पो.ह 98 0725/श्रीधर खोत
पो.ह 060799/ देवकर
पो.शि 080461/आहेर
पो.शि 111518 / सवळी
पो.शि 130229/शेरमाळे
पो.शि 140340/ योगेश मोरे
मपोशि रुपाली दाईंगडे (परि.11) यानी केल्याची माहिती श्री सुधीर कुडाळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट