अवैध कर्जवाटप सावकारांविरुद्ध पुणे आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता यांची विशेष उल्लेखनीय कारवाई..!

पुणे नागरिकांना 9145003100 या व्हाॅट्सप नंबर वर तक्रार दाखल करण्याचे आव्हान…
पुणे : पुणे शहर सावकारी कर्ज वाटप करुन भरमसाट पैसे उकळण्याचे प्रमाण सध्या वाढले आहेत . याबाबतीत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित सावकारावर गुन्हे दाखल केले असुन काही सावकारांना बेड्या देखील ठोकल्या आहेत.
आजपर्यंतच पुणे पोलिसांनी मागील वर्षापासुन जवळजवळ 18 सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून अनेक नागरिकांना सावकारांच्या त्रासातून मुक्त केले आहे.
तसेच पुण्यातील नागरिकांना खासगी सावकाराविरुद्ध तक्रार करता यावी यासाठी पुणे पोलिसांकडून नागरिकांना वारंवार होणाऱ्या सावकारांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी 9145003100 हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे.
त्यामुळे पुण्यातील पिडित नागरिकांनी या क्रमांकावर व्हॉट्सप नंबर द्वारे तक्रार नोंदविण्याचे आव्हान आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
पुण्यातील सावकारीच्या तक्रारीत वाढ झाली आहे म्हणून या माध्यमातून नागरिकांना दमदाटी करुन पैसे उकळण्यारया अवैध सावकारांना चपराक बसण्यासाठी व पिडित नागरिकांना मदत मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विविध पथके तयार करुन कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
यानुसार शहरात 1 जानेवारी 2021 ते आजपर्यंत एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र सावकारी कायदा कलम व भारतीय दंड विधान कलमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.
सावकाराकडून अधिकच्या पैशासाठी तगादा लावला जातो.सावकाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुणे पोलिसानी जो व्हॉट्सप नंबर सुरु केला आहे. त्या नंबरवर नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार असून यामुळे पुण्यात सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
पुणयातील नागरिकांनी अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रार असल्यास या नंबरचा वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com