अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर तलासरी पोलीसांंची धडक कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर
दिनांक ०६/०९/२०२३ रोजी ०४.०० वा. चे सुमारास दादरा नगर हवेली येथून गुजरात राज्यात अवैधरित्या दारु वाहतूक होणार असल्याची पोलीस निरीक्षक श्री. विजय मुतडक, प्रभारी अधिकारी, तलासरी पोलीस ठाणे यांना गोपणीय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय मुतडक, प्रभारी अधिकारी, तलासरी पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून मुंबई अहमदाबाद महामार्ग क्र. ४८ वर गुजरात वाहनीवर काजळी गावचे हददीत ता. तलासरी, जि. पालघर येथे नाकाबंदी लावण्यात आली. नमूदवेळी एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो. क्र. जी. जे. ०३/ बी. डब्लू / ३३११ वरील चालकास थांबण्याचा इशारा केला असता सदर चालक हा टेम्पो न थांबवता पळून गेला. त्यामुळे सदर पथकाने नमूद टेम्पोचा पाठलाग करत सदर टेम्पोस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यामध्ये खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला.
१) १९,५००/- रु किंमतीचे ऑल सिजन गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्की कंपनीचे ७५० मिली च्या काचेच्या ६० बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत ३२५/- रुपये.
२) १६३२०/- किंमतीचे ऑल सिजन गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्की कंपनीचे १८० मिली च्या काचेच्या १९२ बाटल्या प्रत्येकी बाटलीची किमत ८५/- रुपये.
३) १७,७०० रु किंमतीचे अरवेली क्रॅनबेरी ओडका कंपनीच्या ७५० मिली प्रत्येकी २९५ रुपये किमतीचे ६० काचेच्या बाटल्या.
४) १४४००/- किंमतीची दुबर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बियर कंपनीचे ५०० मिली च्या प्रत्येकी टीनची किंमत ७५/- रुपये किमतीचे १९२ नग.
५) २६८८०/- किमतीची दुबर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बियर कंपनीचे ५०० मिली च्या प्रत्येकी टीनची किंमत ८०/- रुपये किमतीचे ३३६ नग.
६) ३,००,०००/- रु किमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो.क्र. जी. जे. ०३/ बी. डब्लू / ३३११ निळया रंगाचा असलेला.
असा एकूण किंमत ३,९४,८००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नमूद आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२१ / २०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा सपोनि / दत्ता शेळके नेमणूक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय मुतडक, प्रभारी अधिकारी, तलासरी पोलीस ठाणे, सपोनि / दत्ता शेळके, सफी/जयराम उमतोल, सफी / जयंत गडग, सफौ / चंद्रभान लंबे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी पार पाडलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com