माणगांव तालुक्यातील कलमजे गावातील वाढवळ कुटुंबाला छावा संघटनेतर्फे आर्थिक मदतीचा हात!

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव :रायगड

माणगांव :- माणगाव तालूक्यातील कळमजे येथील ऋतिक संजय वाढवळ याचा दि.5 सप्टेंबर 2023 रोजी गुरांच्या गोठ्यामध्ये काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने अपघाती मृत्यू झाला. त्याला त्वरित उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखलसुद्धा करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांना ऋतिकला वाचवण्यात अपयश आले. ऋतिकच्या जाण्याने त्याचे सर्व कुटुंबिय आईं, वडील, भाऊ, बहिण तसेच वाढवळ परिवार व संपूर्ण कळमजे गाव, मित्र परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी छावा (रजि.) संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. विजय पाखुर्डे आणि पदाधिकारी यांनी धाव घेत त्याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन करत दुःखात सामील होऊन आर्थिक स्वरूपात मदत केली.

यावेळी कार्याध्यक्ष कोकण विभाग श्री.मुकुंद वाढवळ, रायगड जिल्हा सचिव कोकण विभाग कु.सुशील वाढवळ, माणगाव तालुका अध्यक्ष नंदकुमार पालकर, पाली तालुका अध्यक्ष नंदकुमार थोरवे, म्हसळा तालुका महिला उपाध्यक्ष रेश्मा कानसे, रोहा तालुका उपाध्यक्ष रोशन पाटील, म्हसळा तालुका अनिल जोशी, पाली जिल्हा महिला अध्यक्ष समृद्धी यादव, माणगाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाढवळ तसेच कलमजे पोलीस पाटील, ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या उपस्थीतीत ऋतिकच्या आत्म्यास आदरांजली वाहण्यात आली.ऋतिक हा शांत, संयमी स्वभावाचा मुलगा होता. तो कधीही कोणाला उलट प्रत्यउत्तर न करणारा म्हणतात ना, जो आवडतो सर्वाना! तोची आवडे देवाला! आणि देवाने मात्र त्याला एकाकी नेले. त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परंतु तो कुटुंबाचा एक आधार होता. त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा छावा ( रजि.) संघटनेने पुढाकार घेऊन आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट