सैदापूर ता. सातारा येथील जनरेटर चोरीचा गुन्हा ४ तासात उघड करुन २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केलेले आहे.
दिनांक ०७/८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक पांढरे रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच ०७ / पी- १३११ मधुन दोन इसम महानुभव मठा जवळ चोरीचा जनरेटर विक्री करण्याकरीता घेऊन येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकास नमुद टेम्पो व इसमांना ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकाने महानुभाव मठ सातारा परिसरात सापळा लावून नमुद टेम्पो व दोन इसमांना पकडून त्याच्या ताब्यातून एक किलोस्कर कंपनीचा निळया रंगाचा जनरेटर व टेम्पो क्रमांक एमएच ०७ / पी- १३११ असा एकुण २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सातारा तालुका पोलीस ठाणे गुरनं ४१६ / २०२३ भादंवि कलम ३७९ हा गुन्हा उघड करुन आरोपी व जप्त माल पुढील कारवाईकरीता सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद वेबले, लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, प्रविण फडतरे, राकेश खांडके, अमित माने, अविनाश चव्हाण, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com