विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंधातून झालेले बाळ रेल्वेत सोडणाऱ्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

कल्याण : दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी टिटवाला रेल्वे स्थानकामध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आलं होतं. कल्याण GRP ने या प्रकरणी भादवी कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता जीआरपी पोलीसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही या गुन्ह्याचा तपास करीत होती.

हा तपास करत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता कोपर रेल्वे स्टेशनमध्ये एक महिलाबसली होती. तिच्या हातामध्ये एक पिशवी होती. ज्या पिशवीमध्ये ते बाळ सापडले ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसून आल्याने तिच महिला आरोपी असावी असा संशय पोलिसांना आला म्हणून पोलिसांनी तपास केला सुरु केला.
त्या महिलेचा पत्ता शोधून काढत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे महिले सोबत तिच्या प्रियकराला ताब्यात घेवुन त्या महिलेकडे विचारपूस केली असता या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. यांच्या दोघांमधील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. आणि ते बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वेमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकरांचाही समावेश होता पोलिसांनी आता या दोघांना देखील बेडय़ा ठोकल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com