विवाहबाह्य संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिच्या चिमुकल्याला पाण्यात बुडवून मारलं..

पालघर :बोईसर येथे एका बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या चिमुकल्याच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.
चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध तोडल्यामुळे तिच्या शेजारीच रहावयास असणाऱ्या आरोपीने तिच्या चिमुकल्याला बादलीतील पाण्यात बुडवून मारले.
पालघरमधून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या चिमुकल्याच्या हत्येचं गुढ उकळण्यात बोईसर पोलिसांना यश आलं आहे.
चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध तोडल्यामुळे तिच्या शेजारच्याने चिमुकल्याला बादलीतील पाण्यात बुडवून मारल्याचं समोर आलं आहे. पालघरमध्ये बोईसर येथे ही घटना घडली होती.
पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या हत्येचा उलगडा करत २४ वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याच्या शोधासाठी त्याच्या घरच्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्टर्स व्हायरल केली होती. परंतू त्याचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.
आरोपी महेंद्र सोमर सिंह वय 24 वर्षे आणि चिमुकल्याची आई एकमेकांच्या शेजारीच राहत होते. दरम्यानच्या काळात आरोपीचे विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र अचानक महिलेने विवाहबाह्य संबंधांना सुरु ठेवण्यास नकार दिल्याने शेजाऱ्याने धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिच्या चिमुकल्याचा जीव घेतला. बोईसर पोलीस सध्या या प्रकरणाता तपास करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com