जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रायगड व जिल्हा क्रीडा परिषद रायगड आयोजित माणगांव तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वणी पुरार आय एन टी स्कूल येथे उत्सहात संपन्न.

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव तालुक्यातील वणी पुरार आय एन टी स्कूल येथे दि.1 सप्टेंबर व दि.2 सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय स्पर्धा उत्सहात पार पडल्या यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवाराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केले. यावेळेस माणगांव तालुक्यातील 17 माध्यमिक शाळेतील मुलीने भाग घेतला होता.व मुलांन मध्ये एकूण 40 ते 45 शाळेतील एकूण चारशे ते पाचशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
जिल्हा क्रिडा परिषद स्पर्धा आयोजित माणगांव तालुका स्तरीय स्पर्धा 2023 वणी पुरार आय एन टी अकॅडमी येथे मोठया उत्सहाने दि 1 व 2 तारखेला माणगांव तालुक्यातील सर्व शाळेनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्व विदयार्थ्यांन मध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळत होते.खेळाची आवड ही प्रत्येक विद्यार्थी वर्गात निर्माण होवो त्याच प्रमाणे आपली शाळा रायगड विभागात नव्हे तर नेंशनल विभागात जिकूंन आपल्या शाळेचे नाव रोशन करो असे मार्गदर्शन विजय भामरे क्रिडा शिक्षण प्रतिनिधी माणगांव, राजेंद्र अतनूर तालुका क्रिडा अधिकारी माणगांव, व आय एन टी स्कूलच्या मुख्याध्यापिका अंजुम खान, आय एन टी अकॅडमी स्कूलचे चेअरमन अध्यक्ष इनायत अब्दुल मजीद हुर्जूक, आय एन टी स्कूलचे कार्याध्यक्ष जमीर हूर्जूक व आय एन टी स्कूलचे सचिव शोएब हूर्जूक यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा व मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माणगांव तहसीलदार विकास गरुडकर, माणगांव प्रात अधिकारी संदीपान सानप, माणगांव गटविकास अधिकारी संदीप जठार,माणगांव शिक्षण विभागातील क्रिडा अधिकारी भामरे सर, तालुका क्रिडा अधिकारी सुरेश वाढवलं सर,जिल्हा क्रिडा अधिकारी आतणूकर साहेब,क्रिडा मार्गदर्शन संजय गमरे, स्वाती मुस्कुटे विषय साधन व्यक्ती पंचायत समिती माणगांव व प्रशांत नागे विषय समन्व्यक व्यक्ती पंचायत समिती माणगांव ,तसेच पंच म्हणून डांगे सर, सुनिल रावले सर, प्रवीण गोरे सर,नितीन उभारे सर, सुदर्शन जाधव सर, सातपुते सर, गाडे आर सी सर, रवींद्र बोरसे सर, गजानन देवकर सर, संजय खैरे सर, रुपेश गमरे सर, काप मॅडम,या कार्यक्रमात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी शिंदे सर व आभार सुनिल गोरेगावकर सर यांनी केले या क्रीडा स्पर्धेत वय वर्ष 14,17, व 19 वर्षाच्या विद्यार्थी वर्गानी सहभाग घेतला होता.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com