नाशिक पोलीस आयुक्तांची देहविक्री अड्डय़ावर मोठी धडक कारवाई-भद्रकाली पोलीस ठाणे

नाशिक : गुरुवार दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील देहविक्रयचा तो सर्वात जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गल्लीतील खोल्या अखेर भद्रकाली पोलीसांनी गुरुवारी दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी धडक कारवाई राबवून कायमच्या सील केल्या. हा सील पुन्हा तोडू नये म्हणुन यासाठी परिसरात पोलिसांनी फॅब्रिकेशन कामागारांमार्फत पत्रे लावून घेत वेल्डींगदेखील करुन घेतले आहे.

भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली, तसेच संदर्भ सेवा सगळयाच्या पाठीमागील भींतीला लागून असलेल्य शिवाजी रोड लगतच्या देहविक्रयचा जुना अड्डा पोलिसांनी धाडस दाखवून बंद केला.
यापुर्वी अनेकदा याठिकाणी छापे पडले होते,गुन्हे दाखल झाले होते मात्र येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना यापासून परावृत्त करत हा व्यवसाय बंद करण्यास वारंवार पोलीस अपयशी ठरले होते.
परंतु काही महिन्यांपुर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नोटीस बजावून ठाकरे गल्लीतील देहविक्री करणाऱ्यांना तातडीने स्थलांतरीत होण्याचे आदेश देत जागा मालकाला कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
मात्र याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करणे पसंत केले गेले.मागील आठवडाभरापुर्वीच पांडे यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६च्या कलम ७ नुसार अधिसूचना जारी केली.
या अधिसूचनेत त्यांनी प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था, वसतीगृह, रुग्णालय, नर्सिंगगृह आदी सार्वजनिक ठिकाणांपासून २००मीटरच्या अंतरापर्यंत देहविक्री करण्यास प्रतिबंध असल्याचे घोषित केले. यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा व भद्रकाली पोलिसांनी त्यांच्या आदेशान्वये भर बाजारपेठेतील सार्वजनिक ठिकाणांना लागुन अमळेला देहविक्रीचा अड्डा गुरुवारी सील केला.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. दत्तात्रय पवार, पोलीस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल, कुंदन जाधव, दुय्यम निरिक्षक दिलीप ठाकुर सहायक निरिक्षक प्रणिता पवार यांच्या नेत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
यावेळी सुरुवातीला पोलिसांनी वाहनांच्या ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा करत महिलांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आणि मर्यादित स्वरुपाचा त्यासाठी वेळ दिला.
यानंतरही काही महिलांनी खोल्या सोडण्यास नकार देत असहकार्याचा पवित्रा घेतला तर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली. यावेळी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत त्यांना समज देत त्वरित बाहेर काढले. सर्व खोल्यांची पंचांसमक्ष बारकाईने तपासणी करुन घेत खोल्या कुलुपबंद करुन घेत शासकीय पद्धतीने सील केल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com