Credit Card Update च्या नावाने फसवणूक रक्कम रु. ३१९९९/- परत करण्यात मि.भा.व.वि सायबर गुन्हे कक्षास मोठे यश !!

प्रतिनिधी- अक्षय कांबळे
काशिमिरा :-
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील भाईंदर पोस्टे हद्दीतील महिला नामे श्रीमती रुतुजा यांना ९२६३४०७२०६ हया क्रमांकावरून क्रेडीट कार्ड अपडेट करण्याबाबत कॉल आला होता. सदर कॉल दरम्यान त्यांना AXIS FLIPKART मधुन बोलत असल्याचे भासवून त्यांना अपडेटच्या नावाने ८९२७१८६००६ यावरुन व्हिडीओ कॉल करून तक्रारदार यांनी क्रेडीट कार्ड दाखवून त्याद्वारे ३१९९९/- रुपयाची फसवणूक करण्यात आलेबाबत सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार प्राप्त होती.
(सायबर गुन्हे कक्ष आवक अर्ज क्रमांक – १४४१- बी / २०२३ दि. २७/०७/२०२३)
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेचा वापर करुन CCAVENUE द्वारे शॉपींग केली गेल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Unknown Call/Link / Email विश्वासर्हता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती उघड करू नये
- आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
- अशा फसव्या एमएसएसला, कॉल प्रतिसाद देवू नका.
- असे कॉल प्राप्त झाल्यास तात्काळ बँकेसोबत संपर्क साधावा. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. सदरची कामगिरी श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि / स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी/ प्रसाद शेनोळकर, मपोहवा / १२१०७ माधुरी धिंडे, पोअं/ १२०९५ गणेश इलग, पोअं / १२०९२ प्रविण आव्हाड, मपोअं/ १३१०४ पल्लवी निकम, मपोअं/ १३०८७ अमिना पठाण, मपोअं / १६१०६ सुवर्णा माळी, पोअं/ २२००३ कुणाल सावळे, पोअं/ २२०४० प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.
सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२-२८११ ०१३५
सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८ ०१३५
सायबर गुन्हे शाखा ई-मेल आयडी :- cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com