फलटण शहरामध्ये मोटार सायकल चोरी करणारी सक्रिय टोळी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन जेरबंध करुन ३,१२,०००/- रुपये किंमतीचे ५ मोटार सायकली केल्या हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

फलटण शहर पोलीस ठाणे गु. रजि.नं. २७०/२०२३ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

मा. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक सोो, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री एस.व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक यांना गुन्हे तपास कामी सुचना देवून मोटार सायकल चोरी संदर्भाने खास विशेष पथकाची नियुक्ती केली. त्याप्रमाणे गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने माहीती मिळवून आरोपी यश संदीप ढालपे रा बुधवार पेठ फलटण ता फलटण जि सातारा व निखील मोरे रा जाधववाडी फलटण ता फलटण जि सातारा यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे तपास केला असता ते सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होते परंतु तपास पथकाने त्यांचे कडे कसोशिने, चिकाटीने, कौशल्यपूर्ण तपास करुन नमुद गुन्हयातील आरोपी यांचे कडुन फलटण शहर पोलीस ठाणे कडील गु. रजि.नं १ ) २६८/२०२३ भा.द..िव.स. कलम ३७९ २) २७० / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९३) ३८१ / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९ ४) ४२९/२०२३ भा.द..िव.स. कलम ३७९ ५) ५४९ / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांचे कडुन ३,१२,०००/- रुपये किंमतीचे ५ मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सोर, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिक्षक सोर, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सुरज शिंदे, पोहवा २०५० धायगुडे, पोहवा ११८३ थापते, पोहवा. २११ वाडकर, पोहवा ५७९ शेंडगे, पोहवा. ६६ काळुखे, पोना ५९४ जगताप, म.पो.ना. ७३४ पवार, पोना ४७४ बनकर, पो.कॉ. १९९८ नाळे पो. कॉ. २४६६ जगदाळे, पोर्को २५०१ अवघडे, पोको १९५१ पाटोळे, पोकों २७०१ कर्णे, पोकों २५३० गायकवाड, पोकों २५१५ खराडे, पोर्को १५१४ टिके यांनी सदरची कारवाई केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट