मीरारोड मध्ये सारंग ऑर्केस्ट्रा बार वर पोलीस आयुक्तांची धडक कारवाई..

मीरारोड – बुधवार दिनांक 8 डिसेंबर 2021 रोजी काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस ठाण्या समोर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या लगत चालणाऱ्या सारंग ऑर्केस्ट्रा बार वर पोलिस उपायुक्तांच्या पथकाने बुधवारी रात्री धाड टाकून १७ जणांना ताब्यात घेत ६ बारबालांची सुटका केली.

पोलिस उपायुक्त श्री. अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गांया मोरिस पथकाने बुधवारी रात्री सारंग ऑर्केस्ट्रा बार वर धाड टाकली. त्यावेळी बारमध्ये गायिकाच्या पाठीमागे प्रमाणा पेक्षा जास्त असलेल्या ६ बारबालांना तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नाचवले जात असल्याचे आढळून आले.
पोलिस पथकाने बारच्या ११ कर्मचाऱ्यांना तसेच ६ ग्राहकांना पकडले. बारबालाची सुटका करत बार मधून १७ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून बार चालक जगदीश अमीन व मालक कृष्णा गोविंद शेट्टी ह्यांचा शोध काशीमीरा पोलिस घेत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com