नौपाडयात चोरी करणाऱ्याला नौपाडा पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

ठाणे : दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री नौपाडयातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील प्लायवूडच्या दुकानासह दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या मनोज केदार शाहू वय २७ वर्षे रा. खोपट, ठाणे याला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे की , ठाण्यातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील लखमशीभाई रिटा यांचे ओम प्लायवूड आणि भावेश जैन यांचे मोटो गॅलेक्सी या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार २७ नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9 ते २८ नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला होता.
याप्रकरणी ६ डिसेंबर 2021 रोजी मयूर पटेल यांनी चोरीच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली होती. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार साहेबराव पाटील, पोलीस नाईक संजय चव्हाण आणि सुनील राठोड आदींच्या पथकाने यातील संशयित आरोपी मनोज याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन अधिक तपास पोलीस करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com