बाकुपाटलाची ता. खंडाळा येथे अपघात करुन पळुन गेलेल्या ट्रकचालक व ट्रकला लोणंद पोलीसांनी घेतले ताब्यात…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा:- दि. १६/०८/२०२३ रोजीचे रात्री ११.४० वाचे सुमारास लोणंद ते निरा जाणारे रोडवर बाकुपाटलाचीवाडी येथील भवानीमाता मंदीराचे जवळ रस्त्याचे उताराला लोणंद बाजुकडुन निरा बाजुकडे जाणारे मोटरसायकल स्वार अविनाश लक्ष्मण बर्गे रा.दत्तनगर कोरगाव ता. कोरेगाव जि. सातारा यास समोरुन अज्ञात वाहनाने धडक देवून त्यास गंभीर रित्या जखमी करुन त्यास उपचारास हॉस्पिटल मध्ये घेवुन न जाता पळुन गेले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला होता. याबाबत लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी सदर अज्ञात वाहनाच्या तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते.
गुन्हयाचा तपास चालू असताना सहायक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले व त्याचे सहका-यांनी लोणंद येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासुन सदर अनोळखी वाहन हे हंगेश्वर प्रसन्न असे लिहलेला ट्रक असल्याचे निष्पन्न केले परंतु अंधारामुळे सदर ट्रकच्या नंबरची तसेच चालकाची खात्री होत नसल्याने मोरगाव ते लोणंद व जेजुरी ते लोणंद तसेच लोणंद ते तासवडे टोलनाका या रोडचे ५० ते ६०
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हंमेश्वर प्रसन्न असे लिहलेल्या सर्व ट्रकांची पाहणी केली असता सदर अपघातील संशयित ट्रक हा हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील असल्याचे समजल्याने सदर ठिकाणी जावून तपास करून सदरचा ट्रक हा एम एच १६ टी ६६५५ असल्याचे निष्पन्न करून सदरचा ट्रकच ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

मा. श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा. श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल बी भोसले राहायक पोलीस निरीक्षक श्री विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक, स्वाती पवार पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, आनंदा केंजळे, संतोष नाळे, अतुल कुमार, सर्जेराव सुळ, नितीन भोसले, अवधुत घुमाळ, अभिजीत घनवट, केवन लाळगे, गोविंद आंधळे, प्रमोद क्षिरसागर, सुनिल नामदास तसेच जिविशा बीटचे अविनाश नलवडे यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. सुशिल बी भोसले व श्री. विशाल कदम तसेच त्याच सहका-यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com