माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, न्यायालय गोंदिया, यांचे न्यायालया समक्ष खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🎯 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आरोपी नामे – बळीराम पांडू वाघाडे व 61 वर्षे राहणार विजय टोला जात गोवारी हा जखमी/फिर्यादी नामे – अशोक बळीराम वाघाडे याचे वडील असून जनावरे चारण्याचे काम करतात व आपला उदरनिर्वाह करतात एके दिवशी आरोपी वडील यांनी जखमी मुलगा यास जनावरांचे पैसे गोळा करून आणण्यास सांगितले होते, परंतु मुलांनी पैसे गोळा करून न आणल्याने त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने मुलास लोखंडी फुकणीने मारून गंभीर जखमी केले होते त्यावरून पोलीस ठाणे दवणीवाडा येथे अपराध क्रमांक 01/2018 कलम 307 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स. पो. नि. दिपक जाधव पो.ठाणे दवनीवाडा यांनी केलेला असून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी विरूद्ध सबळ साक्ष पुरावे गोळा करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय गोंदिया यांचे न्यायालयात सादर करण्यात येऊन गुन्ह्याचे केस क्रमांक 15/ 2018 अन्वये माननीय न्यायालयात खटला चालविण्यात आला.
माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय गोंदिया यांच्या न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत यातील फिर्यादी/जखमी मुलगा याने माननीय न्यायालया समक्ष सदर केसच्या सुनावणी दरम्यान सरकार तर्फे उत्तम साक्ष दिली. परंतु जेव्हा आरोपीचे वकील यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केले तेव्हा जखमी यांनी माननीय न्यायालयासमक्ष खोटी साक्ष दिली. यामुळे याचा फायदा आरोपीस होऊन माननीय न्यायालयाने जखमी/ फिर्यादी हा फितूर झाल्याने सीआरपीसी 235 (1) नुसार आरोपीस निर्दोषमुक्त केले.

जखमी/फिर्यादी हा माननीय न्यायालयासमोर फितूर झाल्याने/ खोटी साक्ष दिल्याने सरकारी वकील श्री. घोडे यांनी जखमी/ फिर्यादी याचेविरुद्ध कलम 193 भारतीय दंड विधान संहिता अन्वये खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत माननीय न्यायालयात प्रक्रिया सुरू केली आहे.
सदर प्रकरणावरून असे दिसून येते की माननीय न्यायालयासमक्ष खोटी साक्ष दिल्यास फिर्यादीने फितूर झाल्यास फिर्यादीविरुद्ध सुध्दा न्यायालयीन प्रक्रिया करून कारवाई होऊ शकते.
गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे माननीय न्यायालयात चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमधील फिर्यादी, पंच, साक्षदार यांना असे आवाहन करण्यात येत आहे की, माननीय न्यायालयात चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमध्ये फिर्यादी, साक्षदार, पंच यांनी खोटी साक्ष देवून फितूर होवू नये. अन्यथा खोटी साक्ष देवुन फितूर झाल्यास आपल्याविरूद्ध कायदेशिर कारवाई होवू शकते याची जाणीव असावी.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com