पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांचे आदेशान्वये गोंदिया जिल्ह्यातील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 20 व्यक्तीविरोधात केसेस दाखल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

        पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांनी गोंदिया जिल्ह्यातील घडणाऱ्या घटना चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व नवयुवक, अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून गुन्हेगारी  प्रवृत्तीकडे वाढता कल लक्षात घेता नशापाणी  करून अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चा वापर करून गुन्हे करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्या साठी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समूळ उच्चाटन करण्या करिता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना गोंदिया जिल्ह्यातील अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चां वापर करून नशापाणी करणाऱ्यांवर धाड कारवाई करण्याच्या तसेच विशेष मोहीम राबविण्याच्या निर्देश सूचना दिल्या होत्या. 

            त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.  अशोक बनकर, यांचे निर्देश, सूचना,आदेशान्वये गोंदिया जिल्हा परिसरात नशापाणी (अंमली पदार्थ - गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चा वापर करून गुन्हे करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा म्हणून कार्यवाही करण्या करिता जिल्ह्यात दिनांक 19/08/2023 ते 25/08/2023 दरम्यान कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

             या अनुषंगाने  जिल्ह्यात अंमली पदार्थ चे सेवन करणाऱ्यांच्या विरोधात नशापाणी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीं विरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येवून धाड कारवाई करून अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चा वापर व सेवन करणाऱ्याविरुद्ध कलम 27 अमली पदार्थ अधिनियम सन 1985 कायद्यान्वये पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे -08, रामनगर येथे-2,रावणवाडी येथे -1, देवरी-2, डूग्गीपार - 3 अश्या एकूण 16 कारवाया करण्यात आलेल्या असून 20 इसमाविरूद्ध केसेस दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थाचे साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.

अमली पदार्थाच्या वापर करून सेवन करणाऱ्या खालील इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.

1) दमन राजेश ब्राह्मणकर वय 24 वर्षे राहणार मेंढे चौक गोविंदपुर गोंदिया

2) अरविंद सुरेश कागदे वय 26 वर्षे राहणार पूनाटोली गोंदिया

3) रोशन नारायण भोयर व 24 वर्षे राहणार कन्हरटोली गोंदिया

4) कुणाल बाबुलाल रंगारी वय 28 वर्षे राहणार नर्मदा मंदिर जवळ सूर्या टोला गोंदिया

5) अल्ताफ मिर अली सय्यद वय 22 वर्षे राहणार सावळा डोली गोंदिया

6) बॉबी प्रवीण चव्हाण वय 28 वर्षे राहणार नुरी मज्जिदच्या मागे गोविंदपुर गोंदिया

7) विशाल मधुकर शहारे वय 30 वर्षे राहणार सिविल लाईन गोंदिया

8) हिमांशू गणराज बोरकर वय 27 वर्षे राहणार सडक अर्जुनी

9) अनिकेत प्रभुराज बडोले व 24 वर्षे राहणार गोदामेढी

10) प्रतीक अनिकेत गजभिये वय 23 वर्ष राहणार सडक अर्जुनी गोंदिया

11) धरमवीर उर्फ बिट्टू पप्पी सिंग बल व 21 वर्ष राहणार गोंदिया

12) अमित महेश मस्करे वय 22 वर्ष राहणार विठ्ठल चौक फुलचूर

13) अतुल कुलदीप रामटेककर वय 28 वर्षे राहणार बाजपेयी वॉर्ड गोंदिया

14) रविशंकर जयप्रकाश कावळे वय 53 वर्षे राहणार गौतम नगर गोंदिया

15) उमेश मोरेश्वर कांबळे वय 25 वर्षे राहणार वार्ड क्रमांक 11 देवरी

16) सुकलाल मुन्नालाल विके वय 45 वर्षे राहणार मसूरभावडा

17) आतिश संतोष करोसिया वय 28 राहणार पैकणटोली गोंदिया

18) बिजू जंगली बागडे वय 40 वर्षे राहणार पैकणटोली गोंदिया

19) धर्मराज दादी बावनकर वय 31 वर्षे राहणार गौतम नगर गोंदिया

20) निलेश लक्ष्मीचंद पारधी वय 26 वर्षे राहणार रावणवाडी

               यांचेविरूद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर, रामनगर, रावणवाडी, डूग्गीपार, देवरी परिसरात धाड कारवाई करून केसेस करण्यात आल्या आहेत.
            सदरची धाड कारवाई  मा.वरिष्ठांच्या निर्देश , आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाद्वारे तसेच पोलीस ठाणे गोंदिया, रामनगर, रावणवाडी, डूग्गीपार, देवरी येथील पथकाद्वारे करण्यात आलेली आहे. 

          गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे  जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्याना तसेच नशापाणी, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले ल्याना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अमली पदार्थाचा वापर व सेवन , नशापाणी न करता  सामान्य जीवन जगून गुन्हेगारी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट