अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन दाखलगुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलीसांना मोठे यश

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :-

दिनांक १२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाचे सुमारास यातील फिर्यादी यांचे पती नामे आसिफ गफार घाची, वय २१ वर्षे, रा. पालघर, व्यवसाय रिक्षा व कारचालक यास प्रत्यक्ष रिक्षा स्टैन्डवर तीन अनोळखी इसम भेटले. त्यांनी नाशीक येथून फॅमीली आणणे करीता जायचे आहे असे फिर्यादीचे पती आसिफ घाची यांना सांगीतले. त्यामुळे जासिफ घाची याने त्याचा मित्र महेश सुर्यवंशी यास संपर्क साधुन त्यांचे मालकीची इंटींगा कार मागवीली. गाडी मालक महेश सूर्यवंशी यांनी त्याचेकडील नवीन इटीका कार क्रमांक एम. एच. ४८ सी. के. ३७१६ ही ड्रायव्हर आसिफ घाची यांचेकडे दिली. त्याने तीन अनोळखी इसमांना बसवून गाडीने नाशिक करीता रवाना झाले. फिर्यादी आणि गाडी मालक या दोघानी आसिफ घाची यांना रात्री १२.०० वाजताचे सुमारास संपर्क केला असता त्याचा संपर्क झाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आल्याने फिर्यादी यांनी दि.१३/०८/२०२३ रोजी पालघर पोलीस ठाणे येथे आसिफ हरवले बाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान फिर्यादी यांनी सांगीतल्या प्रमाणे त्याची गाडी नाशिकला न जाता सिन्नर कडून समृध्दी महामार्गाचे दिशेने गेल्याची माहीती मिळाली. त्यामुळे काहीतरी अघटीत घटल्याच्या संशयाला पुष्टी मिळाल्याने फिर्यादी यांची तक्रार पुन्हा नोंद करून आसिफ घाची यास अपहरण करून प्रवासी म्हणुन त्याच्या वाहनात बसणाऱ्या तीन इसमांनी त्यांचे ताब्यातील गाडीसह चोरी करण्याचे उद्देशाने घेऊन गेले म्हणुन त्यांचे विरुध्द पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २९८/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९, ३६५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्र्यय किंद्रे, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना संयुक्तपणे तपास पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने तांत्रीक तपास केला असता सदरची गाडी ही नाशिक-सिन्नर टोल नाका तसेच समृध्दी हायवे मार्गे छतिसगड राज्यातील कुम्हारी टोल नाका येथे गेल्याचे दिसून आले. तसेच नमूद वाहनामध्ये अपेक्षीत चालक आसिफ घाची याचे जागी दुसरा इसम चाहन चालवित असल्याचे दिसुन आले. त्यामुळे आसिफ याचा पालघर पासून नाशिक पर्यंत विशेषतः घाटमार्ग मोखाडा ते नाशीक दरम्यान कसोशीने शोध घेतला असता त्याचे शव हे मोरचुंडी (निलमाती) घाट येथे मोखाडा ते त्र्यंबकेश्वर दरम्यान रस्त्याचे काही अंतरावर झाडा झुडपात गळयाला नायलॉनची दोरी करकचून बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यामुळे सदर गुन्हयात भादवि कलम ३०२, २०१ अशी वाढ करण्यात आली.

त्यानंतर श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये पालघर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांची पथके यांनी पालघर हद्दीत सखोल गोपणीय व तान्त्रीक तपास सुरु केला. दरम्यान गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सदरचे तीन्ही संशयीत हे यापूर्वी बोईसर भागात राहावयास होते. त्यानुसार तिन्ही आरोपीची नावे निष्पन्न केली. त्याची नावे १) धर्मानंद उमाकांत जाल वय २४ रा. कोलवडे, बोईसर ता. जि. पालघर मुळ रा. कोकडमाल पो. उटकेला, ता. भवानी पाटणा, राज्य ओडीसा २) सेसवा ऊर्फ प्रितम सांता मेहर वय २५ वर्षे, रा. कोलवडे, बोईसर ता. जि. पालघर, कपिल संखे, रुम नंबर २ एम आय डी सी बोईसर ता. जि. पालघर मुळ रा. दसपुर पो दसपुर ता. गोलामुंडा तहसील धर्मगड, जि. कालाहंडी राज्य ओडीसा ३) खुशीराम ऊर्फ राजु डोलामणी जाल रा. कोलवडे, बोईसर ता. जि. पालघर, मुळ रा. कोकडमाल पो. उटकेला, ता. भवानी पाटणा, राज्य ओडीसा अशी नावे निष्पन्न करून यांची ओळख पटविण्यात यश आल्याने त्यांचे गावे ओडीसा राज्यात असल्याची खात्री झाली. त्या आधारे यापूर्वीच तांत्रीक तपासाचे आधारे त्या दिशेत रवाना झालेल्या पथकाला सदरची माहिती पुरविण्यात आली. आरोपीत यांचा छत्तीसगड, ओरीसा राज्यात शोध घेतला असता यातील आरोपी नामे १) धर्मानंद उमाकांत जाल यास ओडीसा राज्यातील त्याचे राहते गावी कोकडमाल जंगलातुन वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे सखोल तपास करून व तांत्रीक तपासाचे आधारे आरोपी नामे २) सेसवा ऊर्फ प्रितम सांता मेहर यास नागपुर रेल्वे स्थानक येथुन ताब्यात घेण्यात आले. तसेच यातील पाहीजे तीसरा आरोपी याचा शोध चालु आहे.

अशाप्रकारे आरोपींविरुध्द पालघर पोलीस ठाणे येथे वरील दाखल गुन्ह्यात वरील कलमे बाढवून गुरनं १९८/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३०२, २०१, ३७९, ३६५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात कोणतीही माहीती नसतांना गोपनीय व तांत्रीक तपासाचे आधारे आरोपीची ओळख पटवून त्यांना शिताफीने अटक करण्यात आलेले आहे. तसेच गुन्हात गेला माल इटीका कार क्रमांक एम. एच./ ४८ /सी. के. ३७१६ हस्तगत केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास हा श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग या करीत आहेत.

वरील कामगिरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, श्री. दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे, सपोनि अमोल गवळी, नेमणूक सुरक्षा शाखा पालघर, सपोनि / मल्हार थोरात, पोउपनि / गणपत सुळे, पोउपनि / स्वनिल सावंत देसाई, पोहवा / राकेश पाटील, पोहवा / विजय ठाकूर, पोहवा / दिनेश गायकवाड, पोहवा / कैलाश पाटील, पोहवा / संदीप सरदार, पोहवा / दिलीप जनाठे, पोहवा/निकोळे, पोहवा / नरेंद्र पाटील, पोहवा / दिपक राऊत, पोहवा / धांगडा, पोना केंगार, पोशि/निकम, पोशि/वैभव जामदार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व मसपोनि / मंजुषा शिरसाट, सफी / सुभाष खंडागळे, पोहवा / अशोक तायडे, पोहवा/चंद्रकांत सुरूम, पोहवा / भगवान आव्हाड, पोना / सुयोग कांबळे, पोना / परमेश्वर मुसळे, पोशि/ सागर राऊत, पोशि/ मनोहर पाटील, पोशि/ आराख, पोशि/ डुबल, पोशि/ विशाल कांबळे सर्व नेमणूक पालघर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट