अल्पवयीन मुलीशी गोठ्यात शारीरीक संबंध ठेवून अर्धनग्न फोटो काढून बदनामी करणार्‍यावर गुन्हा दाखल…!

0
WhatsApp Image 2023-08-23 at 2.57.40 PM
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :-

महाड तालुक्यातील नरवण गावातील एका वाडीतील अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवीत तिचे अर्धनग्न फोटो काढून तिची बदनामी करणार्‍या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महाड तालुका पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार या वाडीतील १५ वर्ष १४ दिवस वयाची पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील त्याच वाडीतील १७ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलाने तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत तू मला आवडतेस माझ्याशी लग्न करशील का ? असे विचारून तिने होकार दिल्यानंतर त्याच गावात राहणार्‍या त्या पिडीत मुलीच्या मामाच्या गोठ्यात तिला नेऊन तिचे अर्धनग्न फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले.

त्यानंतर मामाचे घरातही तिच्याशी शारिरीक संबंध ऑक्टोबर 2021 ते आजपर्यत ठेवले.

या दरम्यान या मुलीने त्या मुलाशी बोलणे बंद केल्याने तिच्यावर संशय घेत तिचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हे फोटो तिच्या मामेभावाला पाठवून तिची बदनामी केली.

या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण धक्कादायक गुन्ह्याचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.मायने हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट