माणगांव तालुक्यातील कुणबी युवा मंच मुंबई तर्फे मोफत आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव माणगांव येथे पार पडले.

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव : रायगड

प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे वैद्यकीय शिबिरासाठी मंच अध्यक्ष ज्ञानेश्वर खराडे सत्यजित भोनकर, नारायण शिंदे वैद्यकीय प्रमुख राजेश शिर्के, काशिनाथ शिंदे, प्रफुल भोजने तसेच कुणबी युवा मंच मुबंई तालुका माणगांवचे उपाध्यक्ष सुनिल माठलं, सुभाष भोस्तेकर, निलेश खडतर अजय भोनकर संतोष उडरे मोहन म्हसके नरेश भोसले, महिला सदस्य स्वरूपा भोईर ,तन्वी म्हसके ,कल्पना खराडे, विक्रांन्ती काळेकर, रुपेशा भोस्तेकर, तसेच स्थानिक लोकांच्या उपस्थितीमध्ये आज मोफत आरोग्य शिबीर पार पडले.

या कार्यक्रमसाठी माणगांव महाड पोलादपूर चे आमदार भरतशेठ गोगावले, माणगांव नगर पंचायतचे नगरध्यक्ष ज्ञानदेव पवार,नितीन दसवते,गोरेगाव पोलीस सहायक निरीक्षक नावले, पोलीस सानप, धोडगे, उभारे ,नागाव सरपंच वामन बैकर, वाळवकर रुग्णालय चे सचिन धुमाळ, डॉ. संदेश टेटगुरे, पत्रकार राम भोस्तेकर, पत्रकार सचिन पवार, विवेक काटोलकर, राकेश भोस्तेकर, राजु सुतार, तसेच मेडिसिनसाठी एम आर महेश लहाने ,राजु टेटगुरे, जिगर भोनकर यांनी विशेष सहकार्य करून उपस्थिती दाखवली.

आजच्या या कार्यक्रमसाठी उपस्थित वाळवकर रुग्णालयाचे डॉक्टर परिचारिका मदत स्टाफ प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव डॉक्टर मदत स्टाफ समाज बांधव सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंच च्या वतीने आभार कुणबी युवा मंच चे अध्यक्ष ज्ञानेश्वर खराडे यांनी व्यक्त केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट