समाजविघातक बोगस पत्रकार एम.के.अन्सारीवर कारवाई करण्यासाठी म.पोलीस बॉईज संघटनेचे मनीष जयस्वाल पालघर जिल्हाध्यक्ष यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी यांनी पालघर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जानुसार सध्या पालघर जिल्ह्यात पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी बोगस पत्रकार एम के अन्सारी हा कार्य करीत असल्याचे आम्हा संघटनेला माहिती पेपर व सोशल मीडियाद्वारे मिळाली.

सदर घटनेबाबत आम्ही प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली असता एम के अन्सारी व त्याची गॅंग ही बोईसर परिसरात लोकांची सोशल मीडियावर बदनामी करून, लोकांकडून खंडणी वसूल करून लोकांमध्ये तसेच प्रशासनाची बदनामी करून, अशा प्रकारचे गुन्हे करीत आहेत.

तसेच त्याचे विरुद्ध बोईसर पोलीस ठाणे येथे पाच गंभीर गुन्हे व 30 अदखलपात्र गुन्हे दाखल असताना देखील पोलीस व महसूल प्रशासनाने त्यास तडीपार करणे आवश्यक असताना देखील त्यावर अजून कोणतेही कायदेशीर कारवाई न झाल्याने त्याचे खंडणी व बदनामी तसेच ब्लॅकमेलिंग करण्याची प्रवृत्तीत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.

अशा समाजविघातक इसमावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल
करून योग्य ती सहकार्य करण्याची विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी श्री.समीरजी कडू
मुंबई -पालघर उपाध्यक्ष ,
श्री.घनश्यामजी मोरडिया
श्री.मंगेशजी उईके ,
श्री.चिन्मयजी पाटील,
श्री.दक्षजी मर्दे टीम हजर होती.अशी माहिती श्री .मनीष हरिलाल जयस्वाल मुंबई विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य, मोबाईल नंबर
09920020333 यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट