अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल एकुण 17 गोवंशीय जनावरे (म्हशी, रेडे,) यांची सुटका, किंमती 18 लाख 40 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री. अशोक बनकर, यांनी गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दितील अवैधरित्या चालणाऱ्या धंदयाचे समुळ उच्चाटन कव्हावे या करीता अवैध धंद्यावर प्रभावी धाडी टाकून अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी,आणि पो.नि. स्था. गु. शा. यांना याबाबत निर्देशित केले होते.
या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या निर्देश सूचना, आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणाऱ्या दारु, जुगार, अवैध जनावरे वाहतूक, धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.
या अनुषंगाने दिनांक 17/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो. ठाणे रावणवाडी परिसरात अवैध धंद्यांवर रेड, गुन्हेगार शोध, व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरें भरलेला ट्रक येत आहे अश्या मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. रावणवाडी परिसरातील मौजा- मंडीयाटोला चौक येथे नाकाबंदी लावली असताना रात्री 22.15 वा. च्या सुमारास मौजा तेढवा कडून येणारे एक ट्रक येताना दिसला त्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक मागेच थांबवून रात्रीचा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. त्या संशयित ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली असता, टाटा कंपनी चे ट्रकमध्ये 9 म्हशी, व 8 रेडे असे एकूण 17 जनावरे किंमत 3,40,000/- रू. अवैधरीत्या निर्दयतेने चाऱ्यापाण्याविना कोंबून बंदिस्त केलेल्या स्थिती आढळून आल्याने ट्रक, आणि जनावरे, असा एकूण किंमती 18 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त करण्यात आला.
निर्दयतेने बंदिस्त 17 गोवंशीय जनावरे ( म्हशी व रेडे ) यांची सुटका करून सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत.
सदर प्रकरणी फरार आरोपी चालक- मालक नामे-------------
१. अजित हंसराज सहारे,रा. काटी, ता.जि. गोंदिया
याचेविरुध्द पोलीस ठाणे रावणवाडी येथे प्रान्यांना निर्दयतेने छळवनुक प्रति.अधि. सह कलम महा. पशु संवर्धन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस ठाणे रावणवाडी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक,गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश सूचना प्रमाणे, आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोउपनि महेश विघ्ने, सहा.फौ. मधुकर कृपान, पोहवा. सोमेंद्रसिंह तुरकर, तुलशीदास लुटे, चापोहवा. लक्ष्मण बंजार, पो.शि. संतोष केदार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com