शेतीच्या हिस्सा करिता पत्नीने पतीची विहीरीत ढकलुन केली हत्या…पतीने विहीरीत आत्महत्या केल्याचा केला बनाव… शिवुर पोलीसांनी 72 तासात उलगडले हतेचे कोडे …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

वैजापुर:

दिनांक 13/8/2023 रोजी सांयकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे शिवुर हद्यीतील हिलालपुर पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक 228 मध्ये सुदाम राघु झिंजुर्डे वय 55 वर्षे यांनी त्यांचे शेतातील विहीरीत आत्महत्या केले बाबत त्यांचे पत्नी कमलाबाई सुदाम झिंजुर्डे यांनी शिवुर पोलीसांना माहिती दिली होती मिळालेल्या माहितीवरून लागलीच शिवुर पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पाटील व त्यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेवुन विहीरीतुन बॉडी वरती काढुन घटनास्थळाची सुक्ष्म बारकाईने पाहणी केली. यावेळी मयताची पत्नी कमलबाई झिंजुर्डे हीने तिचा पती नामे सुदाम झिंजुर्डे यांने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याबाबत पोलीसांना माहिती देत होती.

नमुद घटनेच्या अनुषंगाने मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापुर, व सपोनि संदीप पाटील यांनी मयत सुदाम झिंजुर्डे यांचे आत्महत्येच्या घटनेच्या अनुषंगाने परिस्थीतीचा संशय आल्याने पोलीसांनी मयत हिची पत्नी कमलबाई झिजुर्डे हिची कसोशिने चौकशी करता ति पोलीसांना उडवा-उडवीची उत्तरे देवु लागल्याने तिच्यावर अधिक संशय बळावल्याने तिला विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता तिने सांगितले कि, मयत सुदाम यांची पहिली पत्नी ही साधारण 15 वर्षापुर्वी मयत झाली आहे आणि तिला दोन मुले आहेत. त्यामुळे त्याने त्यावेळेस कमलाबाई हिचेशी लग्न केले परंतु तिला ब-याचा कालावधी पर्यंत अपत्य न झाल्याने तिच्या पतीने त्यांची शेत जमीन ही पहिल्या पत्नीच्या मुलांचे नावाने केली होती.

परंतु यादरम्यान साधारण तीन ते चार वर्षापुर्वी कमलबाई हिला सुध्दा मुलगी झाली. त्यामुळे तिने मयत सुदाम हयाचे मागे तगादा लावला कि मला व माझ्या मुलीच्या भविष्यासाठी जमिन आमच्या नावावर पाहिजेत. यावरून त्यांच्यात ब-याच वेळा भांडण होवुन वाद होत होते. याबाबत कमलबाई हिच्या मनात कायम संशय आणि पती सुदाम यांचे विषय रागाची भावना निर्माण झाली होती.
याचकारणा वरून त्यांच्यात दिनांक 13/8/2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास वाद होवुन मोठयाप्रमाणावर भांडण झाले त्यांचे भांडणामध्ये ते त्यांचे शेतवस्तीवरिल असलेल्या विहीरीजवळ भांडत गेले असता पत्नी कमलबाई हिला पती विषयी असलेला राग अनावर झाल्याने तिने पती सुदाम झिजुर्डे यांना विहीरीत ढकलुन दिले. पती सुदाम हा विहीरीबाहेर येण्याचा अतोनात प्रयत्न करत असतांना तिने विहीरीचे काढावर उभे राहुन पतीच्या अंगावर जोरात दगडांचा मारा करून त्यास विहीरीत ढकलुन देवुन दगड मारून ठार मारले. व पतीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला असा कबुली जबाब दिला आहे.

शिवुर पोलीसांनी अत्यंत कसोशिने शास्त्रशुध्द पध्दतीने तपास करुन यातील मयताचे आत्महत्याचे गुढ उकलुन काही तासातच आरोपी मयतांची पत्नी कमलबाई सुदाम झिजुंर्डे वय 48 वर्षे रा. हिलालवाडी , पारोळा शेतवस्ती, हिला हत्येच्या आरोपाखाली जेरबंद केले आहे. तिच्या विरूध्द पोलीस ठाणे शिवुर येथे भादंवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल लांजेवार,अपर पोलीस अधीक्षक, मा. महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, रामचंद्र जाधव, विशाल पैठणकर, किशोर आघाडे, सविता वरपे, श्रध्दा शेळके यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट