पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 5 गुन्हेगार तडीपार आजपर्यंत झोन -2 च्या हद्दीतून 35 सराईत गुन्हेगार हद्दपार

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :-पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, घरफोडी करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गैरकायद्याच्या मंडळीत सहभाग असणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन खालील नमुद ०५ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे (१) अनिल महादेव चांदणे वय ४० वर्षे, रा. गल्ली नं.५२. राजु टेलर शेजारी, तळजाई वसाहत. पुणे (२) हर्षद राजेंद्र देशमुख, वय २५ वर्षे, रा. चाळ नं. ३/७ १२. दत्त मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे, तसेच भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे अनुक्रमे (१) शुभम दिपक ऊर्फ नथ्थु भोरेकर, वय २६ वर्षे, रा. काळुबाई मंदिरामागे, गायमुख जवळ, आंबेगाव बु।।, पुणे (२) दत्ता राहुल कदम, वय २२ वर्षे, रा. साई मंदिरा शेजारी, प्रथमेश व्हिला, तिसरा मजला, जैन मंदिराजवळ, आंबेगाव खु. पुणे (३) किरण परशुराम भंडारे वय २० वर्षे, रा. अभिनव कॉलेज मागे, फिरंगाई माता मंदिरा जवळ केअर ऑफ हनुमंत बेलदरे, आंबेगाव बु।।, पुणे यांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ ०२ कडून आजपावेतो एकूण ३५ आरोपींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे हदपार करण्यात आलेले आहे.

सदर कारवाई मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करून गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट