डोंबिवलीत बनावट चावीच्या आधारे घरफोडी करणा-या एका महीला आरोपी कडुन २,५५,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
डोंबिवली :-
दिनांक:-१२/०८/२०२२ रोजी सकाळी ११:३० ते १:१५
दरम्यान व त्यांचे पती चार रस्ता येथे खरेदी करण्याकरीता गेले असता, सन २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत फिर्यादी यांचे घरी यापूर्वी घरकाम करणारी महीला इसम नामे सिमा फिर्यादी गावडे उर्फ नेहा ढोलम ही माझे घराची डुप्लीकेट चावी तयार करून फिर्यादी यांचे राहते घर :-रूम नं ४०१, मैत्री नगभांगन, एस.वी.सी बॅकचे वर गल्ली नं ३. राजाजी पथ येथे प्रवेश करुन लबाडीच्या उददेशाने वर नमूद वर्णनाची २,९०,०००/- रू. रोख रक्कम व डोंबिवली पूर्व, दागीने ही माझे संमतीशिवाय लबाडीने चोरी करून नेली आहे. वरुन डोंबिवली पोलीस ठाणे गु.र. क:- २८४ / २०२३ कलम ३८१,४५४, भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सपोनि सानप, पोहवा: ५०३/ वाघ, पोहवा ३६२७/ कुरणे, पोहवा १३०७/ सरनाईक, पोअं ७६०६/पोटे, पोअः-८४१३/सांगळे, मपोहवा ३६७५४/जाधव, मपोशि४०७ / राजपुत यांनी डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क :- २८४ / २०२३ कलम ३८१,४५४, भादवि मधील तपासाच्या अनुशंगाने नमुद गुन्हयाच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच वॉचमन ची चौकशीचे आधारे नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी सीमा उर्फ नेहा सदानंद ढोलम वय ४१ वर्षे धंदाः घरकाम राह. रुम नं १२ न्यु सुरज सोसायटी, बी विंग, मद्रासी मंदीराजवळ, राजाजी पथ डोंबिवली पूर्व हीला ताब्यात घेवुन नमुद गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता तीने नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने तिला अटक करून नमुद गुन्हयात चोरी केलेला खालील नमुद मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुददेमाल वर्णन:-
१५,०००/- रुपये रोख रक्कम,
१४०,५००/- रुपये किमतीचे एक सोन्याचा २१.८८० ग्रॅम वजनाचा हार ११,५००/- रुपये किंमतीच एक रोझ गोल्डची १.८६०ग्रॅम वजनाची अंगठी,
८८,०००/- रुपये किंमतीची एक १४,९१०ग्रॅम वजनाची सोन्याची लगड,
००.००/- किंमतीच्या दोन बनावट चाव्या,
२,५५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण श्री. सचिन गुजाळ सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते सो यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि सानप, पोहवा: ५०३ / विशाल वाघ, पोहवा३६२७ / कुरणे पोहवा १३०७ / प्रशांत सरनाईक, पोअ ७६०६ / पोटे, पोअ:-८४१३ / सांगळे, मपोहवा ६७५४/ जाधव, मपोशि४०७/ राजपुत पो.ना. ४५७/ दिलीप कोती यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com