विलेपार्ले पोलीस ठाण्यात अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

विलेपार्ले:

रक्तदान हेच श्रेष्ठ दान,रक्तदान क्षेत्रातील स्वत : श्री. सुरेश प्रभाकर रेवणकर यांनी 150 वेळा केलेले रक्तदान ( 109 वेळा रक्तदान, 41 पांढऱ्या पेशी चे दान) आणि निराधार सेवा केंद्र दिघाशी भिवंडी येथील अनाथ मुलांचे सेवा करत असल्याबद्दल , नवजीवन आधार संस्था ह्या एनजीओच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्राचा काना कोपऱ्यात असलेल्या गरीब गरजूंना अन्न वस्त्र शिक्षणासाठी सहकार्य करणे अशा कार्याबद्दल, रक्तदान क्षेत्रातील भीष्म पितामह समजले जाणारे श्री विनय शेट्टी ह्यांचा आणि पोलिस ठाणे श्री.अविनाश धर्माधिकारी साहेब, व श्री. गोपाळ बा भोसले (पोलीस निरीक्षक), श्री. शशिकांत यादव (पोलीस इन्सपेक्टर) ,श्री.सुर्यकांत खरात (पोलीस निरीक्षक) आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे उपस्थित विलेपार्ले पोलीस ठाणे व इतर सामाजिक संस्था आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात श्री. सुरेश प्रभाकर रेवणकर यांचे पोलिस मित्र असे सन्मान प्रशस्ती पत्र आणि पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आले.

ह्या शिबिराला महात्मा गांधी ब्लड बँक चे डॉ. एम डी श्री किशोर झा ह्याचे मोलाचे सहकार्य लाभले.

ह्या शिबिरामध्ये एकूण 548 युनिट रक्त संकलन करण्यात आले. तमाम दात्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट