सांगटोली येथील जनाधर्मा आधारगृह मध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा…

उपसंपादक: राकेश देशमुख
पनवेल:
दिनांक : १५ ऑगस्ट २०२३.


पनवेल सांगटोली गावातील जनाधर्मा आधारगृहामध्ये १५ ऑगस्ट ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन जनाधर्मा आधारगृह चे संस्थापक सनिप रामा कलोते यांनी केले होते.

दैनिक निर्भिड लेख चे संपादक श्री. कांतीलाल कडू यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच सांगटोली गावातील समस्या सनिप कलोते यांनी सांगितल्या असता, सांगटोली गावातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन श्री.कांतीलाल कडू यांनी केले.











कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कलोते यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. छोटेखानी कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला. या कार्यक्रमाला दैनिक निर्भिड लेख चे संपादक श्री. कांतीलाल कडू, श्री. सचिन पाटील, श्री.महेंद्र पाटील, डॉ. हेमंत पाटील, श्री. हरेश पाटील, श्री. किरण करवकर, श्री. निलेश पाटील, शाम पाटील , वसंत ठाकूर, सांगटोली गावचे पोलीस पाटील अनंता कलोते, मधुकरराव ढेकळे, संजय कांबळे, रंजना पाटील, सुनीता कलोते, राहुल कलोते, दीपक कलोते, ज्येष्ठ बौद्धाचार्य गोसावी कलोते, प्रकाश कलोते, अंगणवाडी शिक्षिका कल्पना कलोते, निराबाई बिनेदर, मनीषा कलोते, सुनील कलोते, सामाजिक कार्यकर्त्या रीमा रावल, जनधर्मा आधारगृह चे अध्यक्ष अजय दुबे, कार्याध्यक्ष दिपाली पारसकर, क्षितिज पर्व फाऊंडेशन चे खजिनदार रामा कलोते, क्षितिज पर्व फाउंडेशन च्या उपाध्यक्षा माई कलोते आदी मान्यवर उपस्थित होते.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com