आष्टा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींसह १७ मोटार सायकल जप्त करण्यात मोठे यश…

उपसंपादक-रणजित मस्के
आष्टा पोलीस ठाणे:
गुन्हयाची थोडक्यात हकीकत वरील विवरन प्रमाणे दि.३०.०७.२०२३ रोजी रात्रो १०.३० वा. ते दि.३१/०७/२०२३ रोजीचे ०६.०० वा. पर्यंत फिर्यादीचे आष्टा येथील राहते घराचे अंगणातुन कोणीतरी | अज्ञात इसम यांनी त्यांचे मालकीची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत आष्टा पोलीस ठाणेस दि.०३/०८/२०२३ रोजी गुरनं १७६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
त्याप्रमाणे मा.पोलीस अधिक्षक श्री. बसवराज तेली साो,मा.उपविभागीय पोलीस अधिकरी श्री. मंगेश चव्हाण सो, परि. पोलीस उपअधिक्षक श्रीमती मनिषा कदम मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आष्टा पोलीस ठाणेकडील पोउपनि आप्पासाहेब पडळकर, पोहेकॉ / ३५८ भोसले, पोहेकॉ/११६१ साळुंखे, पोहेकॉ/१८६८ संकपाळ, पोशि/२५६६ थोरात असे पथक गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना दि. ०९/०८/२०२३ रोजी पोहेकॉ/३५८ भोसले व पोशि/२५६६ थोरात यांना गोपनीय | बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयित इसम आष्टा पोलीस ठाणे हदीतील मुंबई तलावाजवळ एका मोटरसायकल वरुन संशयितरित्या वावरत आहेत.
अशी बातमी मिळालेने खात्री करणेकामी आष्टा पोलीस ठाणेतील वर नमुद गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नामदेव बबन चुनाडे वय ५० वर्षे रा. पंढरपुर जि.सोलापुर असे असल्याचे सांगीतले त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने आष्टा पोलीस ठाणेकडील .
(१) गु.र.नं.१७६/२०२३ भादविस कलम ३७९ तसेच
(२) गु.र.नं.१८४/२०२३ भादविस कलम ३७९
प्रमाणे दाखल गुन्हयांची कबुली दिली त्यानंतर त्याचेकडे अधिक कौशल्याने व तांत्रिकदृष्टया तपास केला असता त्याने आणखी १५ मोटरसायकली चोरी केलेची कबुली दिली व त्या मोटरसायकली विक्री करणेकामी त्याचे मित्र
१) महादेव भारत भोसले
२)गणेश भारत भोसले दोन्ही रा. आकलुज ता. माळशिरस जि.सोलापुर यांचेकडे दिल्याचे सांगीतले त्याप्रमाणे आष्टा पोलीस ठाणेकडील तपास पथकाने वरील दोन्ही मोटरसायकली घेणारे आरोपींचा शोध घेवुन त्याचेकडे अधिक तपास करुन त्यांचेकडुन वरील पैकी सर्व १५ मोटरसायकल हस्तगत करणेत आलेल्या आहेत.
सदरच्या सर्व मोटरसायकल बाबत माहिती घेतली असता मोटरसायकली यवत, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगांव, फलटण पोलीस ठाणे हदीतील असुन त्या त्या पोलीस ठाणेत वरील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. वरील गुन्हयातील एकुण ७,६३,०००/- (सात लाख त्रेसष्ठ हजार रुपये) किंमतीच्या बाजारमुल्या प्रमाणे एकुण १७ मोटरसायकली जप्त करणेत आले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com